News Flash

राजीव गांधी योजनेच्या अटी व फायदे

या योजनेअंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया, औषधोपचार, १२१ फेरतपासणी आदी उपचारांचा लाभ घेता येतो.

 

दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा याकरिता शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया, औषधोपचार, १२१ फेरतपासणी आदी उपचारांचा लाभ घेता येतो. या योजनेसाठीच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
 • अंत्योदय अन्न योजना कार्ड असणे आवश्यक आहे.
 • अन्नपूर्णा कार्ड असणे आवश्यक आहे.
 • त्यानंतर त्या कुटुंबाला राजीव गांधी आरोग्य ओळखपत्र देण्यात येईल.
 • त्यानंतर रुग्ण पुढील वैदकीय उपचार घेऊ शकतो.
 • राहण्याचे शुल्क (सर्वसाधारण कक्ष.)
 • परिचारिका शुल्क.
 • शल्यविशारद शुल्क.
 • भूलतज्ज्ञाचे शुल्क.
 • वैद्यकीय अधिकारी
 • तपासणी शुल्क
 • भूल, रक्त, ऑक्सिजन, शस्त्रक्रिया कक्ष शुल्क, उपकरणे व औषधे.
 • कृत्रिम अवयव रोपण, क्ष-किरण आणि रोग निदान चाचणी.
 • रुग्णालय ते घर प्रवास करण्यासाठी परिवहन शुल्क.
 • या सेवेचा लाभ घेण्याकरिता रुग्णालय अधिकृत असल्याची खातरजमा करून घ्यावी. रुग्णालयामध्ये जागेची कमतरता असल्यास आरोग्यामित्राद्वारे रुग्णाला माहिती देण्यात येते. अधिक माहितीकरिता नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा : १८००२३३२२०० किंवा १५५३८८.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 12:52 am

Web Title: rajiv gandhi scheme terms and benefits
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : वृत्तीतून वर्तनाकडे..
2 वेगळय़ा वाटा : कॉपीरायटिगची कमाल
3 करिअरमंत्र
Just Now!
X