21 September 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : विज्ञान व तंत्रज्ञानविषयक घटक

ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा क्रमांक माहीत करून घ्यावा.

विज्ञान व तंत्रज्ञान

 

‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र या विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यावर हे लक्षात येते की ‘तंत्रज्ञान’ व त्याचा मानवी कल्याणासाठी वापर या अनुषंगाने घटक अभ्यासणे एमपीएससीलाअभिप्रेत आहे.

ऊर्जा –

या घटकातील ऊर्जासाधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे व प्रक्रिया तसेच तंत्रज्ञान यांची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी. ऊर्जेची गरज वेगवेगळ्या क्षेत्रातील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादीबाबतची आकडेवारी (टक्केवारी) भारत व महाराष्ट्राच्या आíथक पाहणी अहवालातून पाहायला हवी. भारतातील याबाबतच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे स्थान माहीत असायला हवे.

ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीची विविध योजनांबाबत त्यांची उद्दिष्टय़े, कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी  यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यांदीचाही आढावा घेणे आवश्यक आहे. भारत व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल व इंडिया इयर बुक या स्रोतांमधून आपली माहिती अद्ययावत करत राहायला हवी.

संगणक व माहिती तंत्रज्ञान –

संगणकाची कार्यपद्धती, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास बेसिक व उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा. सायबर कायद्याबाबतचा अभ्यास पेपर दोनमधील विधी विभागामध्ये पूर्ण होईल. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे आíथक महत्त्व वेगवेगळ्या पलूंनी अभ्यासायला हवे. रोजगार निर्मिती, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक व जीडीपी यामधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आíथक पाहणी अहवालातून पाहायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबीचा अभ्यास इंडिया इयर बुक व रोजच्या घडामोडींतून करायला हवा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीची शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास करायला हवा.

अवकाश तंत्रज्ञान –

या घटकाचे ‘कालानुक्रमांवर’ आधारित टेबल बऱ्याच संदर्भ साहित्यात सापडते. या टेबल्समध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, क्षेपणास्त्र व विविध अवकाश प्रकल्प यांचा अभ्यास पूर्ण होईल. याबाबतच्या अद्ययावत अभ्यासासाठी करंट ग्राफ वार्षकिीमधील संबंधित प्रकरण उपयुक्त ठरेल. कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामधील वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व त्यांचा उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्यातून अभ्यासायला हव्यात. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमविणे, नव्या संकल्पना समजून घेणेही आवश्यक आहे.

जैव तंत्रज्ञान, आण्विक धोरण व आपत्ती व्यवस्थापन –

या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमातील विवेचन विस्तृतपणे केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलूच आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा लॉजिकल व संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत ‘चालू घडामोडी’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी इंडिया इयर बुक व आíथक पाहणी अहवाल इ. मधील संबंधित प्रकरणे बारकाईने पाहावी लागतील. ‘भारताचे आण्विक धोरण’ असा घटक असला तरी आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. ‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमातील नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत ‘चालू घडामोडी’ माहीत असणे आयोगाने गृहीत धरले आहे. या घटकासाठी संकल्पनात्मक अभ्यास व त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास हे अभ्यासतंत्र आवश्यक आहे. मूलभूत विज्ञानाची पुस्तके, इंडिया इयर बुक, योजना व सायन्स रिपोर्टर यांचा वापर यासाठी करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:25 am

Web Title: science and technology component mpsc exam
Next Stories
1 राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
2 हॉटेल मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी मिळवा!
3 नोकरीची संधी
Just Now!
X