एक वर्गभगिनी, नंतर नव्यानं झालेली ओळख, नंतर ‘माझी मैत्रीण’ आणि मग.. माझ्यासाठी ती कोण आणि तिच्यासाठी मी कोण आणि का?.. याचा खोलात जाऊन ‘तमुक’ने प्रामाणिकपणे मांडलेला हा विचार. नात्याबद्दलची मनातली गुंतागुंत ‘बेल कव्‍‌र्ह’पर्यंत पोहोचून कोसळताना होणारी भावनिक घालमेल त्यानंतर मानसिक स्थिरतेकडे पोहोचू शकते?

प्रिय अमुक,

man threatened girlfriend to attack with acid for withdraw rape complaint
तोंडावर ॲसिड फेकून तुझे आयुष्यच खराब करतो….बलात्कार पीडितेला रस्त्यात गाठून….
Loksatta kutuhal Is artificial intelligence always accurate Can she never go wrong The answer is
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता चुकते तेव्हा..
rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
NEET exam, NEET exam Crisis, Uncertainty for 23 Lakh Medical Aspirants, Court Delays neet exam, Regulatory Failures, Regulatory Failures in neet exam, neet exam, neet medical exam, neet exam news, neet news
‘नीट’ दिलेल्या २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी काहीच गांभीर्य नाही?
woman beaten up for extra merital affair
विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून महिलेला जबर मारहाण, मानसिक तणावातून केली आत्महत्या; प. बंगालमधील धक्कादायक प्रकार!
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
Social Process, post-violence,
‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही
Chandrapur, woman, murder,
चंद्रपूर : धारदार शस्त्राने महिलेचा खून, बाबा आमटेंच्या आनंदवनात पहिल्यांदाच…

अनेक दिवस झाले, एकमेकांशी भेटून- बोलून. या सगळया काळवेळात खूप विचार केला. खोल खोल खोदून काढलं स्वत:ला. तुझे विचार जात नाहीत. नेहमीप्रमाणे तुला ते सांगावंसं वाटलं म्हणून हा ईमेल.
खरंच, मला काय हवं होतं आपल्या नात्यातून? तुला काय हवं होतं? स्त्री-पुरुषात मैत्री असते का? ‘मैने प्यार किया’मधला डायलॉग नाही का तो- ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही होते.’ दोस्त म्हणजे काही वेगळं असतं का? अशी निखळ नाती असू शकतात का? काय करावं लागतं त्यासाठी? आणि मैत्री-प्रेमाचं गुंतागुंतीचं जाळं कधी, कसं निर्माण झालं असेल? जे अजून वाढतच जाताना दिसतंय. असं का होतंय?

हेही वाचा : अजूनही अदखलपात्र विधवांचे जिणे!

असे प्रश्न पडता पडता एका गोष्टीवर अडकलो: हे नातं ‘शारीरिक-भावनिक’ आहे. नुसतं भावनिक नाही किंवा नुसतं शारीरिकही नाही. हे एकत्र असू शकतं का मैत्रीत? आपण शाळेपासून ओळखतो एकमेकांना. तरी दहावीपर्यंत मी माझ्याच मस्तीत होतो. तुझ्या घरचे सगळे गोरे लोक तुला काळी म्हणायचे म्हणे. तुझ्यात त्याचा इतका न्यूनगंड होता, की तूच स्वत:ला मूर्ख मुलगी समजायचीस. त्यानंतर आपण कित्येक वर्ष भेटलोही नाही. अनेक वर्षांनी जेव्हा माझं पोट सुटलं तेव्हा सोशल मीडियाच्या कृपेने भेटलो, तेव्हाही आपण मित्रच होतो. मग आपापले व्याप सांभाळत भेटत गेलो. तू काय, एका कॉर्पोरेटमधली एच.आर., मी काय शेअर बाजाराचा अॅ.नालिस्ट. तरीही मला तत्त्वज्ञानाची आणि ते झाडण्याची तर त्याहून आवड. आधी ईमेला-ईमेली सुरू झाली. मग आपण चॅटिंग करत गेलो नि करतच गेलो. कसले कसले फोटो पाठवत राहिलो. (त्यातला तू पाठवलेला चाफ्याच्या फुलाचा फोटो अजूनही मी जपून ठेवला आहे.) आपल्या सगळया आवडीनिवडी जुळल्या, त्यात वाचन, फिल्म या गोष्टी आल्याच. (वाचनाची आवड जुळली नाही तर फ्लर्टिगसुद्धा होऊ शकत नाही, हे तुला समजलं असेलच!) तुझा नवरा तुझा बेस्ट फ्रेंड आहे, असं एकदा अचानक म्हणालीस, मग माझी बायको सध्या माझी फक्त रूममेट आहे असं मी म्हणालो. आणि तिथून आपलं शेअरिंग आणखी वाढलं. मनातलं बोलायला एक हक्काची जागा मिळाली. हे नक्की कसं घडलं? यावर मेंदूत स्रवणाऱ्या केमिकल्सच्या अकॅडेमिक भाषेमध्ये सांगता येईल. कारण तू मला एकदा ऑक्सिटोसीनबद्दल बरंच काय काय ग्यान देणारा कुठलासा तरी यूटय़ूब व्हिडीओ पाठवला होतास. आणि मी काही तरी तत्त्वज्ञान झाडायला सुरुवात केली होती की, मैत्रीच्या वटवृक्षाखाली सगळी नाती स्थिरावतात, वगैरे. मग माणूस हा ‘पॉलिअॅहमरस’ आहे, लग्नसंस्था हा एक मूर्खपणा आहे, यावरही बोललो होतो. तरीही, मला तर मैत्री आणि प्रेम यात वेगळं काय हेच कळत नाही, इतका मी धडाधड प्रेमात पडतो! पण तू तुझ्या बाजूने नुसत्या मैत्रीवर ठाम होतीस. तुला प्रेम आणि मैत्री हे एकत्र करायचं नव्हतं. नंतर तुझ्याकडून मैत्री- माझ्याकडून प्रेम म्हणून जे काय होतं त्यात तरंगतच पुढे जात राहिलो. आणि काही दिवसांतच माझ्याकडून ही ओढ इतकी वाढत गेली, की माझ्या डोक्यात नुसते तुझेच विचार. कामावरही फोकस होईना. तुझं पण तेच झालं असावं का? पण तू खूप प्रॅक्टिकल होतीस. आणि माझ्यातला बोका जागा झाला होता. मला तुझं पूर्ण अस्तित्व हवं होतं. त्यापायी मी माझ्या बायकोशी- म्हणजे जी माझी लग्नाआधीची बेस्ट आणि लग्न झाल्यावर चार वर्षांची रूममेट किंवा ओके ओके फ्रेंड होती, तिच्यावरही गुरगुरायला लागलो. असं कधी घडलं नव्हतं. मग आपल्यातही जे व्हायचं तेच झालं. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा जो बेल कव्‍‌र्ह असतो ना, त्याच्या टोकावर चढत जाऊन सगळं धाडकन खाली कोसळायला सुरुवात झाली. मला वेळ देणं तुला शक्य नाही, हे तू स्पष्टपणे सांगितलंस. दरम्यान, शेअर बाजारातच एका नवीन मुलीशी ओळख झाली. मग आता ही माझी नक्की कोण यावर विचार करू लागलो. पण मनातलं सांगायची जागा तूच होतीस. ना बायको होती, ना ही नवीन मुलगी. तुझे विचार कायम डोक्यात असतातच. तुला मैत्री हवी होती, त्याचा आदर राखून मी मैत्रीतच राहिलो. पण फिजिकल गोष्टी छळत राहिल्या मनात, हेही मान्य करतो. विचार केला की नुसतं ग्रे शेडमधलं चित्र दिसतं. डोक्यात नुसती गुंतागुंत. माझं काही चुकतंय का?

हेही वाचा : संघर्षांनंतरचं यश

‘लडका-लडकी दोस्त नही होते,’ हा जो डायलॉग मारलाय ना, तो अर्धवट आहे. त्याला हो किंवा नाही इतकं बायनरी सोपं उत्तर नक्कीच नाही. बरीच permutations- combinations करून, स्वत:चं डोकं खाऊन आपण त्या उत्तराकडे जायचा प्रयत्न करू शकतो. तरी, उत्तर सापडण्याची अपेक्षा धरू नकोस. तसंही ‘अपेक्षा करायची नसतेच’, हा धडा दोघंही परत परत शिकलो आहोत. ही गणितं कशाची करावी लागतील, तर ‘फिजिकल’ आणि ‘इमोशनल’ गोष्टींची. म्हणजे दोन व्यक्तींत कोणाला काय हवंय, कसं हवंय आणि कधी हवंय? या दोन व्यक्ती कोणीही असू शकतील. स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष असंही असू असेल. तसंच, त्यांचं नातं काय आहे, यावर त्यांच्या त्यांच्या कोडयाची उत्तरं तयार होतील. तर तुझ्या-माझ्या म्हणजे स्त्री-पुरुष एवढयाच नात्यातली गणितं बघू. जेव्हा दोघंही शारीरिकदृष्टया आकर्षित होतात, तेव्हा ते आकर्षण दडपून ठेवणं अवघडच असतं. संधी मिळाली की गोष्टी ‘सेक्शुअल’ आकर्षणाकडे वळतात. मग या फिजिकल-सेक्शुअल-इंटिमेट गोष्टी दिन ब दिन चढतच जातात. मग एका टोकावर जाऊन खाड्कन कोसळतात. वाद मर्यादेपलीकडे गेले की भावनिक मैत्री राहणंही अवघड होऊन जातं. physical- sexual’ या डेडली कॉम्बोमध्ये नाही म्हटलं तरी स्वार्थ, इगो, अपेक्षा, हाव, अपूर्णता, दु:ख सगळं येत राहतं. त्या इंटिमेट आठवणी सतत छळत राहतात. त्यानं आपली स्थिती सारखी खाली-वर होत राहते. हा सगळा केमिकल लोचा तेव्हा नाही समजत. आता इतका वेळ गेल्यावर जाणवतो.

तू एकदा म्हणाली होतीस, तुझे आई-बाबा एकमेकांशी एकनिष्ठ राहिले. तसं राहता आलं पाहिजे. तसं एकनिष्ठ माझेही आई-बाबा राहिले. जुन्या पिढीतले लोक हा खेळ बराच (त्यातल्या त्यात) चांगल्या पद्धतीनं निभावून नेत. त्यांचं ठोक असायचं- मैत्री ती मैत्री, लग्न ते लग्न. त्यासाठी काही तरी ध्येयबिय समोर ठेवत, पण म्हणून त्यांना कोणी कधी दुसरी व्यक्ती आवडलीच नसेल हे कशावरून? ते मनमोकळेपणानं बोलतील तेव्हा समजेल ना. असं लहानग्यांशी, विशेषत: आपल्या मुलामुलींशी तर बोलायचं नसतं. आणि हा ‘त्या त्या काळाचा महिमा’, असं ही जुनी पिढी मोठया अभिमानानं म्हणते. त्यांना त्या काळात लग्नाशिवाय इतर मैत्रिणी असण्याची मुभा नव्हती. (तरीही, अशी बरीच उदाहरणं देता येतीलच.) पण आपल्याला आहे, तर आपल्या काळाचा महिमा उपभोगावा. ‘जेनझी’मधली पोरंपोरी तर लग्नही करणार नाहीत असं दिसतंय. तसं झालं तर चांगलंच होईल! सगळेच सगळयांबरोबर ‘friends with benefit’ राहतील. पण म्हणून नात्यांमधले गदारोळ थांबतील असं वाटत नाही.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती..! : ‘घरेलू’ म्हणून एकटीही?

हे जग बुडण्याच्या अवस्थेपर्यंत नक्कीच आलंय. त्यात ही मानवी नातीगोती, मैत्री-प्रेम या गोष्टी मनाला लावून घ्याव्यात इतक्या काही महत्त्वाच्या नाहीत. आणि किती ते सेक्सविषयी कुतूहल, टॅबू; जणू काही चमत्कारच! पण अलीकडे वाटतं, की तत्त्वज्ञानाच्याही दोन स्थिती कराव्यात. एक- ‘सेक्शुअली- भरल्या पोटी’; दुसरी- ‘सेक्शुअली- उपाशीपोटी’. मग समजेल, की या सगळयात अडकून बसण्यापेक्षा, ‘ते सगळं’ साजरं करून अजूनही काय काय करता येतं आयुष्यात. कुठल्याही नात्यातल्या लोकांनी स्पष्ट बोललेलं बरंच असतं. अगदी एकमेकांच्या उरावर बसून हिशोब मांडू नका, पण थोडं तुला काय हवं नि मला काय हवं याचा एकमेकांचा आदर राखून जमाखर्चाचा ताळेबंद मांडला तर काय हरकत आहे? भांडा-तंटा, पण सगळयांनी ‘१ॠंल्ल्रू’’८’ मजेत नांदा. मनाला लावून सीरियस न झालेलं बरं. कारण त्यात ना सगळा वेळ वाया जातो. अशा काय काय चुकलेल्या गोष्टी हळूहळू एकेक कळतायत; पण उशीर झालाय. तरी ठीके, हे जे कधी बोललो नाही, ते लिहून मोकळं होता येतंय, त्यानं हलकं वाटतंय. काउन्सिलरकडे जायची गरज नाही, म्हणून या ई-मेलरूपी पत्रांना आणि ते वाचण्यासाठी उपलब्ध असलेल्या माणसांना तोड नाही.

हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व : लढा.. लोकशाहीसाठी!

तेव्हा, लडका-लडकी हे ‘दोस्त’ असण्याआधी जर नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी असले तर मैत्रीवर परत यायला जंगलात जाऊन तपश्चर्या करावी लागेल. ही तपश्चर्या करताना मला तुझा नि तुला माझा, गोड चेहरा आठवून हसू यावं. तसं झालं तर हीच आपल्या मैत्रीनं कमावलेली सगळयात भारी गोष्ट ठरेल. ईमेलमधून आपलं बोलणं सुरू झालं. तेव्हा तू ‘अमुक’ होतीस नि मी ‘तमुक’. आता वाटा परत वेगळया झाल्या असल्या, तरी शेवटी पुन्हा या ईमेलच्याच प्रवाहात येऊन स्थिरावलो. तेव्हा एकच प्रार्थना आहे, की जेव्हा मनात खूप साचलं असेल, ते तुझ्याशी ईमेलवरून बोलायचा तरी अधिकार दे.

या पत्रातून बोलण्याचा तुला त्रास झाला, तर मात्र मनात काही साचणारच नाही याची दक्षता घ्यावी लागेल मला.
तुझा,
तमुक

hrishpalande@gmail.com