बागकाम हा तसा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. त्यामुळे घर कितीही मोठं वा छोटं असलं तरी उपलब्ध होईल त्या जागेत फुलझाडे, वनस्पती, वेली यांची लागवड केली जाते. अगदी चाळीमधल्या घरातही खिडक्यांच्या गजांना लागलेल्या कुंडय़ा दिसतात. घर आणि अंगण ऐसपैस असेल तर एखादी छोटीशी बागच फुलवली जाते. थोडक्यात, बागकामाच्या हौसेमध्ये जागेची मर्यादा आड येत नाही. असं असलं तरी प्रत्येक जण आपापल्या परीने आपली बाग फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. दुर्दैवाने असं करताना योग्य ज्ञान वा मार्गदर्शन घेतलं जात नाही. चुकीच्या झाडांची निवड, कुंडय़ांची चुकीची निवड, अपुरी सूर्यप्रकाश व्यवस्था अशा अनेक गोष्टींमुळे बाग बहरत नाही. शिवाय या बगिच्याचं जमेल त्या पद्धतीने कुंडय़ा वा झाडांची भर घालताना एकत्रितपणे ते सुसंगत दिसतील का, याचाही विचार केला जात नाही. बागकामावर अनेक पुस्तके व अन्य साहित्य उपलब्ध आहे. मात्र, यासाठीही स्मार्टफोन उपयुक्त ठरू शकतो. अँड्रॉइडवरील ‘डीवायए गार्डन आयडियाज’ (DYA Garden Ideas) हे अॅप तुमच्या बागकामाला दिशा आणि सौंदर्य मिळवून देऊ शकते. या अॅपमध्ये बागेमधील झाडांची रचना कशी करावी, कुंडय़ांची आकर्षक मांडणी, वेगवेगळ्या झाडांची संगती यांसह टाकाऊ वस्तूंचा बागकामात कसा वापर करता येईल, याची माहिती दिली आहे. या सर्व गोष्टी कशा करायच्या याचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनही या अॅपमध्ये उपलब्ध आहे.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
बगिच्याचे सौंदर्य खुलवा
हे अॅप तुमच्या बागकामाला दिशा आणि सौंदर्य मिळवून देऊ शकते.
Written by आसिफ बागवान

First published on: 07-05-2016 at 01:23 IST
मराठीतील सर्व अॅपचं विश्व बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home and terrace gardening tips