‘भिशी’ हा सुजाता लेले यांच्या ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचा भिशी गट तीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यातून मैत्रीचे निर्माण होणारे बंध टिकवून ठेवणे फार कठीण आहे. याचे कारण ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने सर्वांचे स्वभाव सारखे नसतात. पण यात कोणी तरी चार पावले मागे घेतल्यास ही पेल्यातील वादळे शांत होण्यास वेळ लागत नाही. असो. भिशीच्या महिलांनी परस्परांना पुस्तके वाचायला दिल्यामुळे ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीचा पुरेपूर अनुभव येत असेल. यातून आणखी एक गोष्ट समजली, ती म्हणजे आपल्या जन्माचा जोडीदार शोधायचा झाला तर मुले वधू-वर सूचक मंडळात, आपल्या वाईट सवयी कशा लपवून ठेवतात ते समजले. परंतु कोणालाही अंधारात ठेवणे हे चुकीचे आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असल्यामुळे, नवरा-बायको, सासू-सून किंवा सासू-सासरे यांच्याशी जमवून घेणे म्हणजे मुलींची एकप्रकारे तारेवरची कसरतच असते. त्यामुळे संसार जर टिकवायचा असेल तर नवरा किंवा बायकोने दोन पावले माघार घेणे हिताचे असते. नाही तर कोणा तरी एकाच्या हेकट स्वभावामुळे, जन्मभरासाठी आणाभाका घेऊन, लग्नबंधनात अडकलेल्या जोडप्यांची नाती क्षणार्धात उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. एकंदरीतच ठरलेल्या कार्यक्रमांतून, तसेच सध्या मोबाइल, नेटच्या माध्यमांमुळे हरवत, धूसर होत तसेच तुटत चाललेली नाती जोडण्याचे काम ही ‘भिशी’ करत आहे, हेही नसे थोडके.

  • गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली

परिमाणे बदलली

७ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला ‘४ बी चळवळ समजून घेताना’ हा गायत्री लेले यांचा लेख वाचला. मध्यंतरी ‘से नो टू ड्रग्स’ ही चळवळ कार्यरत होती. तशीच ही चळवळ पूर्वी काही घरातल्या ज्येष्ठ कन्या बापाच्या पश्चात त्याचा संसार आपल्या खांद्यावर घेत, स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना मूठमाती देत स्वत:च्या गाठीला असेच चार नकार बांधून घेत होत्या. आता स्त्रियांना उपलब्ध संधीमुळे त्याची परिमाणे बदलली आहेत, इतकेच.

Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
  • अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी

Story img Loader