News Flash

पाकिस्तानातील अपघातात १३ ठार

येथून ४० किलोमीटर अंतरावरील शेखुपुरा या पंजाब प्रांतातील शहराजवळ लेव्हल क्रॉसिंगवर शनिवारी एका मोटरसायकल रिक्षास रेल्वेगाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला आणि दोन

| July 7, 2013 03:56 am

येथून ४० किलोमीटर अंतरावरील शेखुपुरा या  पंजाब प्रांतातील शहराजवळ लेव्हल क्रॉसिंगवर शनिवारी एका मोटरसायकल रिक्षास रेल्वेगाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला आणि दोन मुलांसह १३ जण ठार झाले आहेत.
सदर रिक्षा रेल्वेमार्ग ओलांडत असताना कराचीहून लाहोरकडे जाणाऱ्या गाडीने त्यास धडक दिली. त्यावेळी रिक्षामधील १० जण जागीच ठार झाले, तर उर्वरित तिघे जण जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले.
रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवीत होता. सदर रिक्षा रेल्वेमार्गात अडकून पडली आणि त्याचवेळी तेथे आलेल्या रेल्वेगाडीने या रिक्षाला जोरदार धडक दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:56 am

Web Title: 13 killed in pakistan train accident
टॅग : Pakistan
Next Stories
1 स्थळ नकाशावरून आरोपींचा दावा अधिकाऱ्यांनी फेटाळला दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण
2 नितीशकुमारांना बिहारचे मतदार धडा शिकवतील
3 मंडेला यांची जीवरक्षक प्रणाली काढण्यास नकार
Just Now!
X