काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलांच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन भारतीय जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. येथील ख्वाजा बाग परिसरातून लष्कराचा ताफा जात असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार पहाटे साडेतीन वाजता हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून मोठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीचा फायदा घेऊन गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत.
शहीद होण्यापूर्वी ‘त्या’ जवानाने फडकवला होता तिरंगा
यापूर्वी १५ ऑगस्टला श्रीनगर मधल्या नौहट्टामध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफचे  कमांडर प्रमोद कुमार शहीद झाले होते.