येथील मालवाहू गटाराची स्वच्छता करण्यासाठी त्यात उतरलेल्या कामगारांपैकी किमान चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. हे चारही जण भारतीय होते. गल्फ टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार हे चौघेही जण केरळमधील होते. इशक (२६), फैसल (३०), मुनीर (२०) आणि मोहम्मद अशी या चौघांची नावे आहेत. स्वच्छतेसाठी गटारात पहिल्यांदा दोघेच जण उतरले होते. ते बेशुद्ध झाल्याने त्यांना शोधण्यासाठी म्हणून आणखी दोघे जण उतरले. मात्र चौघांनाही आपला जीव गमवावा लागला.