News Flash

पत्नीने पाणी दिलं नाही म्हणून पित्यानेच आठ महिन्याच्या मुलाला आपटलं भिंतीवर

पत्नीने पाणी दिलं नाही म्हणून संतापाच्या भरात पतीने आपल्याच आठ महिन्याच्या मुलाची हत्या केली.

पत्नीने पाणी दिलं नाही म्हणून पित्यानेच आठ महिन्याच्या मुलाला आपटलं भिंतीवर
संग्रहित छायाचित्र

पत्नीने पाणी दिलं नाही म्हणून संतापाच्या भरात पतीने आपल्याच आठ महिन्याच्या मुलाची हत्या केली. लखनऊच्या निगोहा भागात मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पाणी न देण्यावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. संतापाच्या भरात पतीने आपल्याच मुलाची हत्या केली.

निगोहा पोलिसांनी आरोपी सुरेंद्र साहूला (३०) अटक केली आहे. सुरेंद्र साहू संतप्त स्वभावाचा आहे. रात्री १० च्या सुमारास तो घरी आला. मी दरवाजा उघडून आतमध्ये काही काम करण्यासाठी गेली. मी त्याला पाणी न देता आतमध्ये निघून गेली म्हणून त्याने मला बडबडण्यास सुरुवात केली असे लक्ष्मीने सांगितले.

रागाच्या भरात त्याने कॉटवर झोपलेल्या आठ महिन्यांच्या मुलाला उचलले व भिंतीवर फेकले. भिंतीला आपटून खाली पडल्यानंतर मूल रडत होते. त्या आवाजाने साहू आणखी संतापला. त्याने पुन्हा मुलाला उचलले व जमिनीवर आपटले. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पाय पकडून गयावया करत होते पण तो ऐकला नाही असे साहूची पत्नी लक्ष्मीने पोलिसांना सांगितले. मुलाची हत्या केल्यानंतर साहू फरार झाला. लक्ष्मीने मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. तिने शेजाऱ्यांना बोलावले. ते मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 2:28 pm

Web Title: 8 month old in up killed by father repeatedly throws him on floor dmp 82
Next Stories
1 मायावतींचा भाऊ अडचणीत! आयकर विभागाकडून ४०० कोटींचा बेनामी प्लॉट जप्त
2 भाजपा आमदाराचा प्रताप; टार्गेट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना बनवले पक्षसदस्य
3 पाकिस्तानमुळे एअर इंडियाला 430 कोटींचे नुकसान
Just Now!
X