जर्मनीची कंपनी बायोनटेक (BioNTech) आणि अमेरिकेच्या फाइजर (Pfizer) यांच्या डेटा सेंटरवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर आता Moderna व्हॅक्सिनचा डेटा चोरी करण्यासाठी कंपनीच्या डेटा सेंटरवर सायबर अटॅक झाल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यामध्ये करोनाच्या लसीशी संबंधित काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स चोरी झाल्याची माहिती मॉडर्ना व्हॅक्सिनकडून देण्यात आली आहे.
सायबर हल्ल्याबाबतची माहिती कंपनीला नव्हती, युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) याबाबत सूचना दिल्यानंतर Moderna कंपनीला सायबर हल्ला झाल्याचं कळालं, असं वृत्त वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलं आहे. हे डॉक्यूमेंट्स कंपनीने जेव्हा परवानगीसाठी सरकारकडे पाठवले होते त्या दरम्यान चोरण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान, युरोपियन मेडिसिन एजन्सीने यापूर्वीच काही कंपन्यांच्या व्हॅक्सिनचा डेटा अॅक्सेस केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती.
यापूर्वी फाइजर-बायोनटेक या दोन्ही कंपन्यांवरही व्हॅक्सिनच्या डेटासाठी सायबर हल्ला झाला होता. त्यावेळी करोना लसीशी (COVID-19 Vaccine) संबंधित फाइल्स बेकायदेशीरपणे अॅक्सेस करण्याचा प्रयत्न झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 12:19 pm