20 September 2019

News Flash

उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी व लष्करात चकमक

उत्तर काश्मीर मधील लडूरा या खेडेगावात लष्कर व पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

| September 2, 2015 12:53 pm

उत्तर काश्मीर मधील लडूरा या खेडेगावात लष्कर व पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. दहशतवादी या गावातील एका घरात आल्याची खातरजमा होताच लष्कर व पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले.
संशयित घराभोवती लष्कर व पोलिसांनी एकत्रितपणे घेराव घातला असता घराच्या आतल्या बाजूने लष्करावर गोळीबार करण्यात आला. या ठिकाणी दोन ते तीन दहशतवादी आले असल्याचे लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले असून अद्याप कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.
उत्तर काश्मीरमधील राफियाबाद विभागात दहशतवाद्यांविरोधात कारवाईची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात या ठिकाणी चार दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातले होते व एका दहशतवाद्याला अटक केली होती.

First Published on September 2, 2015 12:53 pm

Web Title: army personnel surround militants holed up in north kashmir
टॅग Army,Militants