भारतातील ७०० लोकांचे स्वीस बॅंकेत सहा हजार कोटी असल्याचा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. केजरीवाल म्हणाले, एचएसबीसीच्या जीनेव्हा येथील बॅंकेच्या खात्यात सातशे लोकांची खाती असून फ्रान्स सरकारने ही यादी पाच वर्षांवूर्वीच केंद्र सरकारला सुपूर्त केली आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले, अनिल आणि मुकेश अंबानी यांचे शभर कोटी, जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांचे ८० कोटी, काँग्रेस खासदार अनू टंडन यांचे १२५ कोटी रुपये स्वीस बॅंकेच्या खात्यात जमा आहेत. हा सर्व पैसा कुठून आला आणि या सर्वांची चौकशी का होत नाही असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. आयकर खात्याने या सर्वांना नोटीस पाठवून त्यांची कसून चौकशी करावी असं ते पुढे म्हणाले. तसेच, काळा पैसा दडवण्यात एचएसबीसी बॅंकेचा मोठा हात असल्याचेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.