News Flash

मोठी बातमी! ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता

ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे

जगावर सध्या नव्या करोनावताराचं सावट गडद होऊ लागलं असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे. यासोबतच ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत. ब्रिटन सध्या करोनाशी लढा देत असतानाच लसीला मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.

नवा विषाणू जास्त संसर्गजन्य, पण प्राणघातक नाही

करोनामुळे जगभरात जवळपास १७ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधीन वुहान येथून सुरु झालेल्या करोना व्हायसमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. सध्या इतर देश करोना संकटामधून बाहेर पडत असताना ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत मात्र करोनाच्या नव्या विषाणूंनी थैमान घातला आहे. हा नवा प्रकार जास्त वेगाने परसत असल्याचं सरकार आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी ब्रिटनसोबतचा व्यापार आणि विमानसेवा बंद केली आहे.

नव्या करोनामुळे केंद्राचं महत्त्वाचं पाऊल, ब्रिटन-भारत विमानसेवा बंदी वाढवली

अ‍ॅस्ट्राजेनेका आणि करोना लसीची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांनी करोनाचा नवा प्रकार किती प्रभावी आहे याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी करोनाची लस नव्या प्रकारावरही उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 1:41 pm

Web Title: astrazeneca oxford covid vaccine cleared by uk sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
2 नाताळाच्या पार्टीला गेल्याने कट्टरतावादी मुस्लीम युवकांनी मित्रालाच केली बेदम मारहाण
3 लाच म्हणून एक किलो पेढे मागणारा पोलीस अधिकारी निलंबित
Just Now!
X