एटीएममध्ये कधीही कितीहीवेळा पैसे काढण्याच्या सवयीला आता लगाम घालावा लागणार आहे. एकाच महिन्यात पाच वेळा पैसे काढले किंवा खात्यात किती शिल्लक आहे याची छाननी केली, तर त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शनिवार, १ नोव्हेंबरपासून ही योजना लागू होत आहे.
देशभरात विविध बँकांची एकंदर एक लाख ६० हजार एटीएम केंद्रे आहेत. या केंद्रांच्या व्यवस्थापनावर बँकांचा मोठा खर्च होतो. हा भार कमी करण्यासाठी अखिल भारतीय बँक संघटनेने रिझव्र्ह बँकेकडे एटीएम वापरावर शुल्क आकारणीची ही मागणी केली होती.  
दरम्यान, तुमचे खाते नसलेल्या बँकेच्या एटीएममधून तुमच्या बँकेच्या एटीएम कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरही मर्यादा आली असून असे तीनच व्यवहार मोफत राहाणार आहेत. त्यापुढील व्यवहारांवर संबंधित बँकेकडून शुल्क आकारले जाणार आहे.