15 August 2020

News Flash

“किती कंजूस आहेस रे तू, संपूर्ण रात्र…;” संतापलेल्या चोराने घरमालकासाठी सोडली चिठ्ठी

ही चिठ्ठी नोकराला सापडल्यानंतर त्याने याबद्दल पोलिसांना माहिती दिली

चोराने घरमालकासाठी सोडली चिठ्ठी

दररोज चोरी आणि दरोड्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रांमधून समोर येत असतात. अनेकदा चोर चोरी करुन निघून गेल्यानंतरही घरातील व्यक्तींना काहीच कळत नाही. चोरांचे अनेक किस्सेही बातम्यांमध्ये अनेकदा समोर येत असतात. असाच एक किस्सा इंदूरमध्ये घडला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मध्य प्रदेशमधील साहजपूर जिल्ह्यामधील आदर्श नागीन नगरमध्ये एका चोराने रात्रभर जागून घरफोडी करण्याची तयारी केली. मात्र बऱ्याच कष्टानंतर खिडकीमधून घरात शिरल्यानंतर चोराला घर रिकामे असल्याचे दिसले. त्यामुळे या चोराची निराशा झाली. मात्र निराश झाल्यानंतर त्याने घरातून निघून झाल्याआधी चिठ्ठी लिहून घरमालकाला आपली नाराजी कळवली. घराचे मालक असणारे परवेश सोनी यांच्यासाठी चोराने लिहिलेली एक चिठ्ठी सोनी यांच्या नोकराला सापडली. या चिठ्ठीमध्ये घरमालक कंजूस असल्याचं चोरानं म्हटलं होतं. “खूप कंजूस आहेस रे तू. खिडकी तोडण्याची मेहनतही फुकट गेली. संपूर्ण रात्र खराब झाली,” असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला होता.

सोनी हे सरकारी इंजिनियर अजून त्यांना देण्यात आलेले घर हे जंगलाजवळ असल्याने तेथे त्यांनी जास्त सामान ठेवलेले नव्हते. ही चिठ्ठी मिळाल्यानंतर नोकराने त्याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरातील कपाटं जोर लावून उघडण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आलं. घरभर कपडे पडलेले पोलिसांना अढळून आले. सोनी यांच्या डायरीमधील पान फाडून चोराने त्यावर आपली नाराजी व्यक्त करणारा मजकूर लिहिला होता. सोनी हे कामानिमित्त बाहेर असून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. चोराने लिहिलेली ही चिठ्ठी अक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली असून पोलिस सीसीटीव्ही फूटेजही तपासून पाहत आहे.

महिन्याभरापूर्वी असाच प्रकार बिहारची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये घडला होता. येथील एका घरामधील सर्वांना एका खोलीत कोंडून चोरांनी ६० लाखांचा डल्ला मारला होता. त्यावेळी चोरांनी घरातील बेडरुममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर “भाभी जी बहुत अच्छी हैं” असं लिहिण्याबरोबरच काही अश्लील भाषेतील मजकूरही लिहिला होता. लिपस्टीकने आरशावर हा मजकूर लिहिण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 4:22 pm

Web Title: bahut kanjoos hai rey tu angry thief leaves note for homeowner after he finds nothing to steal scsg 91
Next Stories
1 पहाटे चार वाजता प्रियकाराच्या फिटबीटचे नोटीफिकेशन आलं अन् त्याचं पितळं उघडं पडलं
2 सतत मोबाईलला चिकटून राहणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी केलं ट्विट आणि…
3 नागरिकत्व सुधारणा विधेयक काय आहे ? जाणून घ्या …
Just Now!
X