News Flash

बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटावरील बंदी कायम

दिल्ली बलात्कारप्रकरणी 'बीबीसी'ने केलेल्या माहितीपटावर घालण्यात आलेली बंदी १५ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे.

| March 18, 2015 01:31 am

दिल्ली बलात्कारप्रकरणी ‘बीबीसी’ने केलेल्या माहितीपटावर घालण्यात आलेली बंदी १५ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या बंदीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांना तूर्ततरी कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्याचवेळी या माहितीपटावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जी सूचना प्रसिद्ध केली होती, ती न्यायालयापुढे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्या. आर. एस. एंडलॉ यांनी याप्रकरणी पुढील सुनावणी १५ एप्रिललला घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंततरी या माहितीपटावरील बंदी भारतात कायम राहणार आहे. केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी घातल्यानंतर ती उठविण्याची मागणी वेगवेगळ्या स्तरांतून करण्यात येत आहे. ‘बीबीसी’च्या लेस्ली उदविन यांनी केलेल्या या माहितीपटामध्ये दिल्ली बलात्कारप्रकरणातील दोषी मुकेश सिंग याची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीत त्याने व्यक्त केलेल्या मतांमुळे सर्वस्तरांना तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. बंदी घातल्यानंतरही इंग्लंडमध्ये बीबीसी फोर वाहिनीवरून या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 1:31 am

Web Title: ban on bbc documentary to continue till april 15
Next Stories
1 वक्तव्य मागे घेण्यास यादव यांचा नकार
2 ननवरील बलात्कार आणि चर्च तोडफोड प्रकरणी ‘पीएमओ चिंतीत’; अहवाल मागवला
3 मोदी हे तर साबरमतीचे महंत; रमेश यांचे टीकास्त्र
Just Now!
X