बांगलादेशाच्या एका महिला क्रिकेटपटूकडे पोलिसांना नशेच्या तब्बल १४ हजार गोळ्यांसह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी या महिला क्रिकेटपटूला आजीवन तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जिओ टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार नाजरिन खान मुक्ता असे या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. नाजरिन पहिल्या दर्जाची क्रिकेट खेळाडू असून ती ढाका प्रिमिअर लीगमध्ये खेळते. सामन्यानंतर खेळाडुंची बस परतत होती त्यावेळी नाजरिनकडे नशेच्या या गोळ्या आढळून आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. पोलिसांनी चित्तगाँगमध्ये बस थांबवून बसची तपासणी केली होती. पोलीस अधिकारी प्रोणब चौधरी म्हणाले की, तपासात नाजरिनकडे एका बॅगमध्ये ठेवलेल्या १४ हजार याबा पिल्स मिळाल्या. मेथमपेटामिन आणि कॅफिनने या गोळ्या तयार केलेल्या असतात. बांगलादेशमध्ये स्थानिक लोक याला याबा गोळ्या म्हणतात. या नशा येणाऱ्या सिथेंटिक गोळ्या आहेत. ज्याचे सेवन केल्यास वेगाने नशा चढते.

याप्रकरणी नाजरिनला आजीवन कारावास भोगावा लागू शकतो. ज्या परिसरातून नाजरिन गोळ्यांसह अटक करण्यात आली. तिथे अशाप्रकारच्या गोळ्या बनवणारी लॅब असल्याचे समोर आले असून तिथे लाखो गोळ्या तयार केल्या जातात आणि नंतर संपूर्ण बांगलादेशात त्या वितरित केल्या जातात.

म्यानमारमधील हिंसाचारामुळे सुमारे ७ लाख रोहिंग्या शरणार्थींनी बांगलादेशात प्रवेश करण्यास सुरूवात केली तेव्हा या नशेच्या गोळ्या तस्करी करणारे लोक अधिक सक्रीय झाले. रोहिंग्या मुसलमानांच्या माध्यमातून या गोळ्यांची तस्करी केली जात. मागील तीन महिन्यात सुमारे ९० लाख याबाब गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबा गोळीचा वापर थांबवण्यासाठी बांगलादेश सरकार या गोळ्यांच्या तस्कारांना मृत्युदंड देण्याची योजना बनवत आहे.