सध्या जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी आणि तिसरी लाट आली आहे. भारतामध्येही करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. असं असतानाच दुसरीकडे भारताने एक मे पासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय असल्याचे मानले जाते. असं असतानाच दुसरीकडे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असणाऱ्या बिल गेट्स यांनी लसींसंदर्भात एक वक्तव्य केल्याने ते चर्चेत आलेत. विकसनशील देशांच्या हाती लसींचा फॉर्म्युला देण्यात येऊ नये. लसनिर्मिती करणे हे फार जबाबदारीचं काम असतं, असं गेट्स यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य करताना भारताचं उदाहरण दिलं आहे. यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> दुसऱ्या लाटेचा केंद्राला विसर?; मोदींनी तीन महिन्यात घेतल्या फक्त चार बैठका

स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेट्स यांना करोना लसीकरणासंदर्भातील स्वामित्व अधिकार म्हणजेच इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्ससंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. लसी बनवण्यासंदर्भातील माहितीवर असणारा स्वामित्व अधिकार रद्द करुन जगभरातील अनेक देशांबरोबर ती माहिती शेअर करावी का?, असं केल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये लसींचा पुरवठा वेगाने होईल असं वाटतं का?, असा प्रश्न गेट्स यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना गेट्स यांनी, “नाही” एवढचं म्हटलं.

नक्की वाचा >> मोदी सरकारच्या ‘व्होकल फॉर लोकल’ला करोनाचा फटका; भारत मदतीसाठी मित्रराष्ट्रांवर निर्भर

पुढे आपली भूमिका स्पष्ट करताना गेट्स यांनी भारताचाही उल्लेख केला. “जगामध्ये लसनिर्मिती करणाऱ्या अनेक संस्था आहेत. सर्वचजण लसीच्या सुरक्षेसंदर्भात फार गंभीर आहेत. असं असलं तरी करोना लसीचा फॉर्म्युला इतर देशांना सांगितला जाऊ नये असं मला वाटतं. अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे निर्मिती केंद्र आणि भारतातील लसनिर्मिती केंद्रात फरक आहे. आपण लस आपल्या पैशांनी आणि तज्ज्ञांच्या मदतीने निर्माण करतो,” असं गेट्स म्हणाले. म्हणजेच लस बनवणे हे फार जबाबदारीचं काम असून विकसनशील देशांकडून ते जबाबदारीने पार पाडलं जाईल की नाही यासंदर्भात गेट्स यांनी आपल्या वक्तव्यातून शंका उपस्थित केली.

नक्की वाचा >> Coronavirus: विमा कंपन्यांना क्लेम एका तासात मंजूर करण्याचे आदेश

नक्की वाचा >> “धन्य ते योगीजी आणि धन्य ते मोदीजी”; भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया

लसीचा फॉर्म्युला हा काही एखाद्या रेसिपीसारखा नाहीय की जो कोणासोबतही शेअर करता येईल. तसेच लसीचा फॉर्म्युला हा केवळ बौद्धिक संपत्तीचा किंवा स्वामित्व अधिकाराचा प्रश्न नाहीय. लस बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. अनेक प्रयोग करावे लागतात. लसींची अनेकदा तपासणी आणि चाचण्या कराव्या लागतात. लस बनवताना प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक हाताळावी आणि पडताळून घ्यावी लागते, असंही गेट्स यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> काहीतरी करा… देशातील नामांकित संस्थांमधील १०० संशोधकांचे मोदींना पत्र

नक्की वाचा >> देश एकच, लस एकच मग दर वेगवेगळे का?; उच्च न्यायालयाची केंद्रासहीत सीरम, भारत बायोटेकला नोटीस

बिल गेट्स यांनी पुढे बोलता श्रीमंत देशांनी आधी स्वत:च्या देशात लसीकरणाला प्राधान्य दिल्याबद्दल आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलं नाही असं म्हटलं आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ३० वर्षांच्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे हे योग्य आहे. मात्र दुसरीकडे ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमधील ६० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण झालेलं नाही हे लक्षात घ्यायला हवं. करोना संकटामुळे परिस्थिती गंभीर झालेल्या देशांना दोन ते तीन महिन्यांमध्ये लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा गेट्स यांनी व्यक्त केलीय. एकदा विकसित देशांमधील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ते देश इतर देशांना लसी पुरवतील असं गेट्स यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.