News Flash

“पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र”; काँग्रेस टूलकिट वापरत असल्याचा भाजपाचा आरोप

काँग्रेसने टूलकिटचे आरोप फेटाळले

देशात करोनाचं इतकं मोठं संकट असताना राजकारण काही थांबत नाही. आता टूलकिटवरून काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसनं करोना संकट काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपानं केला आहे. तसेच देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. तर काँग्रेन नेत्यांनी भाजपाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजपा नेते आणि मंत्र्यांनी काँग्रेसवर टूलकिटचे आरोप करणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टूलकिटबाबतची पत्रकं भाजपा नेत्यांनी शेअर केली आहेत. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘Indian Stain’ आणि ‘Modi Strain’ असे शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबत कुंभ मेळ्यातून करोनाचा प्रसार झाल्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपा नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी रोज करत असलेलं ट्वीटही टूलकिटचा भाग असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. जाणीवपूर्वक कुंभमेळ्यावर कमेंट्स केली गेली आहे. मात्र ईदवर गप्प असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

याप्रकरणी काँग्रेसनं पलटवार करत भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

देशावर करोनाचं संकट घोंगावत असतान राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. भाजपाने केलेल्या टूलकिट आरोपनंतर आता राजकारण रंगणार यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 2:52 pm

Web Title: bjp allegation on congress using toolkit to destroy pm modi image rmt 84
टॅग : Bjp,Congress
Next Stories
1 “माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सूट,” नरेंद्र मोदींनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
2 MP: करोनाच्या भीतीने रॉकेल प्यायला; मृत्यूनंतर रिपोर्ट आला निगेटीव्ह
3 Cyclone Tauktae: ‘ओएनजीसी’चं जहाज बुडालं; २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश
Just Now!
X