पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची चौकशी केल्याविनाच त्यांना टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातून दोषमुक्त करण्यात आल्याबद्दल भाजपप्रणीत एनडीएने आश्चर्य व्यक्त केले आहे. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीच्या वतीने चौकसी करण्यात आली असून त्याच्या अहवालाच्या मसुद्यात पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना क्लीन चिट देण्यात आली असल्याने तो अहवाल सर्वस्वी फेटाळावा, असे आवाहनही भाजपने केले आहे.