इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेल्या #10YearChallenge ने सध्या धुमाकूळ घातला आहे. जुने फोटो, मिम्स, टोमणे, सामाजिक संदेश असं बरचं काही या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले जात आहे. यामध्ये अगदी सेलिब्रिटी, ब्रॅण्ड्सबरोबरच आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. विरोधीपक्षांवर शेरेबाजी करण्यासाठी, टिका करण्यासाठी अनेक नेत्यांनी हा हॅशटॅग वापरून फोटो पोस्ट केले आहेत. मात्र आता थेट भाजपाने या व्हायरल ट्रेण्डचा आधार घेत लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पाच वर्षात काय केले हे #5YearChallenge या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून अनेक फोटो शेअर करण्यात आले असून यामध्ये सन २०१३ साल आणि २०१९ सालाची तुलना करण्यात आली आहे. अगदी कुंभ मेळ्यापासून ते स्वच्छ भारत योजनेतेपर्यंत आणि बांधकाम क्षेत्रापासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात कशाप्रकारे भाजपाच्या कार्यकाळात देशाने प्रगती केली आहे यासंदर्भातील फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. चला तर पाहुयात काय काय पोस्ट केले आहे भाजपाने आपल्या या #5YearChallenge मोहिमेमध्ये…

कुंभ मेळ्यासाठी २०१३ साली देण्यात आलेली रक्कम १ हजार ३०० कोटी. भाजपाच्या कार्यकाळात २०१९ साली कुंभ मेळ्यासाठी देण्यात आलेली रक्कम ४ हजार २०० कोटी

vishal patil marathi news, sangli lok sabha vishal patil latest marathi news
दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम भाजप खासदारांनी केले – विशाल पाटील
DD News Logo changed
‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून जाणारा इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे नियोजित वेळेआधी पूर्ण केला पाच वर्षात

बोगीबील पूल २०१३ साली आणि आत्ता २०१९ साली

खरीप पिकांचे तेव्हाचे आणि आत्ताचे किमान समर्थन मूल्य (MSP)

कोल्लाम बायपास हा ४३ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मोदी सरकारने २०१५ साली हाती घेतला आणि तो पाच वर्षांच्या आता बांधून पूर्ण केला.

रब्बी पिकांचे तेव्हाचे आणि आत्ताचे किमान समर्थन मूल्य (MSP)

२०१३ साली देशातील ५० टक्के घरांमधील व्यक्तींकडे बँक खाते होते आज देशातील जवळजवळ सर्वच घरांमधील व्यक्तींचे बँक खाते असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

देशात २०१३ साली ८४ हजार सामान्य सेवा केंद्रे होती हीच संख्या २०१९ रोजी वाढून ३ लाखहून अधिक झाली आहे असं भाजपाचं म्हणणं आहे.

ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण २०१४ मधील ३८ टक्क्यांवरून २०१९ मध्ये ९५ टक्क्यांपर्यंत पोहचल्याचा भाजापाने दावा केला आहे.

पाच वर्षापूर्वी ५५ टक्के घरांमध्ये गॅस कनेक्शन होते आज हा आकडा ९० टक्क्यांवर पोहचल्याचा भाजपाचा दावा

ग्रामीण भागातील घरांमध्ये वीज पोहचवण्याचे प्रमाण पाच वर्षात २५ टक्क्यांनी वाढले

उद्योगानुकूलतेबाबत देशाच्या मानांकनात वेगाने वाढ २०१४ साली १४२ व्या क्रमांकावर असणारा भारत २०१८ साली या यादीमध्ये ७७ व्या स्थानी

परदेशी गुंतवणूकदारांमध्ये वाढ

गावागावांमध्ये रस्ते पोहचले

शेती संबंधीत स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली

अशाप्रकारे भाजपाच्या आयटी सेलने #10YearChallenge चा व्हायरल ट्रेण्ड इनकॅश करुन #5YearChallenge च्या माध्यमातून भाजपा सरकारच्या कार्यकाळातील कामांचा आढावा नेटकऱ्यांसमोर मांडला आहे.