भारतीय नौदलासाठी फायटर जेट विमानांच्या पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी आघाडीवर असलेली बोईंग कंपनी आता इंडियन एअर फोर्ससाठी विमान बनवण्याची ऑर्डर मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने एअर फोर्सला दोन इंजिन असलेल्या फायटर जेट विमानांच्या खरेदीवर विचार करण्यास सांगितले आहे. तेव्हापासून १५ अब्ज डॉलरचे हे कंत्राट मिळवण्यासाठी बोईंगही जोरदार प्रयत्न करत आहे.

याआधी एअर फोर्सला सिंगल इंजिनच्या १०० फायटर जेट विमानांच्या पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी लॉकहीड मार्टिन कॉर्प एफ-१६ आणि साब एबी ग्रिपेन या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. या दोन्ही कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणातर्गंत स्थानिक भारतीय कंपनीसोबत मिळून भारतात विमान बांधणी करायची तयारी दाखवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या महिन्यात केंद्र सरकारने एअर फोर्सला दोन इंजिन असलेल्या फायटर विमानांसाठी निविदा मागवायला सांगितल्या तसेच बोईंगच्या एफ/ए-१८ सुपर हॉरनेट विमानाचे मूल्यमापन करायला सांगितल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. भारतीय नौदलासाठी बोईंगच्या फायटर विमानांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास अशी ५७ विमाने विकत घेण्यात येणार आहेत. पुढच्या काही आठडयात संरक्षण मंत्रालयाकडून फायटर विमानांसंदर्भात कंपन्यांकडून माहिती मागवली जाऊ शकते. खरेदी प्रक्रियेचा हा पहिला टप्पा असतो. मेक इन इंडिया धोरणातंर्गत या फायटर विमानांची निर्मिती भारतात होणार आहे. एअर फोर्सच्या नवीन गरजांबाबत काहीही माहिती मिळालेली नाही असे लॉकहीड मार्टिन आणि साबकडून सांगण्यात आले आहे.