News Flash

‘लंच बॉक्स’ चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

त्यांनी आजवर अनेक सीरिज आणि चित्रपटांसाठी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केले होते.

बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचे निधन झाले आहे. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन्ही किडनी फेल झाल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सहर यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. या बातमीनंतर बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सहर यांच्या निधनानंतर राजकुमार राव, हुमा कुरेशी, अनुराग कश्यप, शिबानी दांडेकर, रोहित सराफ, मिताली पालकर, निमरत कौर, हर्षवर्धन कपूर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, मसाबा गुप्ता, मानवी गागरू, मुकेश छाबड़ा आणि इतक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

seher aly latif passes away, seher aly latif death bollywood, Seher Aly Latif, casting director seher aly latif,

सहर यांनी आजवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिजसाठी कास्टिंग डिरेक्टरचे काम केले आहे. ‘द बेस्ट एग्जॉटिक मैरीगोल्ड होटल’, ‘मिलियन डॉलर आर्म’, ‘शकुंतला देवी’, ‘दुर्गामती: द मिथ’, ‘मॉनसून शूटआउट’ आणि ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. तसेच काही वेब सीरिजसाठी देखील काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:13 pm

Web Title: casting director seher aly latif passes away due to renal failure and cardiac arrest avb 95
Next Stories
1 महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
2 Coronavirus in UP : कोण क्रिटीकल आहे पाहण्यासाठी बंद केला ऑक्सिजन पुरवठा; २२ जणांचा मृत्यू?
3 Coronavirus: देशातल्या दैनंदिन बाधितांची संख्या प्रथमच लाखाच्याही खाली, मृत्यूंच्या संख्येतही घट!
Just Now!
X