24 February 2021

News Flash

राम रहिमच्या ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये ७५ कोटी, १४३५ कोटींची स्थावर मालमत्ता

हरयाणा सरकारने कारवाईचा फास आवळला

राम रहिम. (संग्रहित)

बलात्काराच्या गुन्ह्यात तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयातील रहस्ये एकेक करून उलगडत असतानाच ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये ७४.९६ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘डेरा’ची अनेक बँकांमध्ये तब्बल ४७३ खाती आहेत. राम रहिमच्या नावाने असलेल्या १२ बँक खात्यांमध्ये ७.७२ कोटी रुपये आहेत. तर दत्तक मुलगी असलेल्या हनीप्रीतच्या सहा बँक खात्यांमध्ये १ कोटींहून अधिक रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे राम रहिमच्या चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या हकिकत एन्टरटेन्मेंटच्या नावाने असलेल्या २० बँक खात्यांमध्ये तब्बल ५० कोटी रुपये आहेत.

राम रहिमच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. हरयाणा सरकारकडून करण्यात येणाऱ्या चौकशीत राम रहिमचा डेरा सच्चा सौदा आणि मुख्यालयाशी संबंधित कार्यालये आणि व्यक्तींच्या नावाने असलेल्या ५०४ बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. त्यातील ४७३ बचत आणि मुदत ठेवी खाती आहेत. राम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी घडवून आणलेल्या हिंसाचारानंतर सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी ‘डेरा’च्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे आदेश पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दोन्ही सरकारांना दिले होते. त्यानुसार ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हरयाणात असलेल्या ‘डेरा’च्या मालमत्तेची यादीच सरकारने तयार केली आहे. डेराची सिरसामध्ये तब्बल १४३५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच डेराशी संबंधित ५०४ बँक खाती आहेत. त्यातील ४९५ खाती सिरसा जिल्ह्यातील बँकांमध्ये आहेत. त्यातील बहुतांश मुदत ठेवी आहेत. तर काही राम रहिम, मुलगी हनीप्रीत, चरणप्रीत, मुलगा जसमीत, पत्नी, डेरा सच्चा सौदा ट्रस्ट आणि संबंधित कार्यालयांच्या नावाने संयुक्त खाती आहेत. राज्य सरकारने ती सर्व खाती गोठवली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 10:44 am

Web Title: chief gurmeet ram rahim singh dera sacha sauda has rs 74 96 crore 473 accounts in multiple banks
Next Stories
1 नवरात्रीची नऊ वाहनं : ‘सिंहवाहन’
2 ‘चेन्नई पॉलिटिक्स’!; केजरीवाल-कमल हसन यांच्यात आज चर्चा
3 जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश
Just Now!
X