चीनची राजधानी बीजिंग व आजूबाजूच्या भागात प्रदूषणामुळे पुन्हा तीव्र स्वरूपाचे काळे धुके तयार होणार असून येत्या आठवडय़ात पुन्हा एकदा शाळा बंद ठेवाव्या लागतील व लोकांना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त करावे लागेल, असे सांगण्यात आले. बीजिंग-तिआनजिन-हेबई भागात मंगळवार व बुधवारी मोठय़ा प्रमाणात काळे धुके निर्माण होईल असा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय हवामान केंद्राने म्हटले आहे की, या भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचे काळे धुके पसरेल.