News Flash

चीनची पुन्हा घुसखोरी, भारतीय जवानांच्या विरोधानंतर परतले चिनी सैनिक

डोकलाम वाद आता कुठे शमला असताना चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली

(संग्रहित छायाचित्र)

डोकलाम वाद आता कुठे शमला असताना चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याची माहिती आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या काही सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती, पण भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना विरोध केल्यानंतर चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.


वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) वरील अरुणाचल सेक्टरमध्ये चीनच्या सैनिकांनी ही घुसखोरी केली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 10 दिवसांपूर्वी ही घटना घडली. ‘तुम्ही भारताच्या हद्दीत आला आहात’, असे भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना सांगितल्यानंतर ते त्यांच्या हद्दीत परतल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. याशिवाय आयटीबीपीच्या अहवालानुसार, चीनचे दोन हेलिकॉप्टर्सही भारताच्या हद्दीत आले होते. 27 ऑग्सट रोजी सकाळी जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास हे हेलिकॉप्टर लदाखमध्ये पाहण्यात आले. जवळपास पाच मिनिट हे दोन्ही हेलिकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत घिरट्या घालत होते असं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.

गेल्या वर्षी डोकलाम वादानंतर चीन आणि भारताचे बिघडलेले संबंध आता कुठे सुरळीत होताना दिसत होते. मात्र, पुन्हा चीनकडून घुसखोरीची घटना झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:05 pm

Web Title: chinese troops cross line of actual control sent back by indian army
Next Stories
1 फ्लॅटमध्ये आढळला पत्रकार महिलेचा मृतदेह
2 VIDEO: एनकाउंटर करताना रिव्हॉल्वर जाम; पोलिसांनी काढला गोळीबाराचा आवाज
3 चांगल्या हिंदूंना एक धार्मिक स्थळ पाडून त्याजागी राम मंदिर नकोय : शशी थरुर
Just Now!
X