येथे एका शिकवणी चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला; त्यानंतर या शिक्षकास अटक करण्यात आली.
मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पंकज आरोरा या खासगी शिकवणी चालकाने आपल्यावर बलात्कार केला आहे असे लुधियानाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त परमजित सिंग पन्नू यांनी सांगितले. परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असे सांगून अरोरा याने तिला शिकवणी वर्गात येण्यास आग्रह धरला. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून व्हिडीओ चित्रफीत तयार केली व तिला ब्लॅकमेल केले. आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीची तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत तेरा वर्षांच्या मुलीवर पाच जणांनी पठाणकोट येथे सामूहिक बलात्कार केला व नंतर ब्लॅकमेल केले. पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राकेश कौशल यांनी सांगितले,की या प्रकरणी अर्जुन याला अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2014 रोजी प्रकाशित
शिकवणी चालकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार
येथे एका शिकवणी चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला; त्यानंतर या शिक्षकास अटक करण्यात आली.

First published on: 24-08-2014 at 05:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 10 student raped by tuition teacher in ludhiana