04 August 2020

News Flash

करोना लस : जगातील पहिल्या फेज ३ चाचणीला UAE मध्ये सुरूवात

१५ हजार जणांना देण्यात आली लस

जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लसीवर जगभरात संशोधन सुरू आहे. काही देशांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यशही मिळालं आहे. परंतु अशातच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झालेली ही जगातील पहिलीच लस आहे.

दुबईमधील दी ४२ हेल्थकेअर आणि चीनमधील मोठी लस निर्मिती करणारी कंपनी सिनोफार्म यांनी एकत्रितरित्या ही लस तयार केली आहे. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमधील नागरिकांसहित प्रवाशांना ही लस देण्यात आली. नोंदणी करण्यात आलेल्या १५ हजार जणांना गुरूवारी अबू धाबीमधील एक आरोग्य केंद्र शेख खलिफा मेडिकल सिटीमध्ये ही लस दिली. ज्या ठिकाणी संक्रमणाची संख्या अधिक असते त्या ठिकाणी त्या लसीचा प्रभाव पाहण्यासाठी वैद्यकीय चाचण्या लवकर घेतल्या जात असल्याची माहिती चीनमधील तज्ज्ञ ताओ लीना यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना सांगितलं.

जी ४२ ने जारी केलेल्या निवेदनानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य विभागाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद हे या लसीच्या चाचणीत भाग घेणार्‍या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक होते. संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चीनद्वारे विकसित करत असलेल्या लसींवर विश्वास आणि चीनसोबत सहयोगाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून महामारीला दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं याद्वारे दर्शवलं असल्याचंही तज्ञ्जांनी म्हटलं. कंपनीच्या प्रमुखांसहित आणखी १ हजार जणांना स्वेच्छेनं ही लस देण्यात आली. दरम्यान, सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू असलेल्या अन्य लसींच्या तुलनेत या लसीनं आशादायी परिणाम दर्शवले असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 12:12 pm

Web Title: coronavirus vaccine phase 3 first clinical trial in world started in uae jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 पँगाँग टीएसओमधून चिनी सैन्याला माघार घ्यावीच लागेल; अन्यथा भारत…
2 चीनला इशारा; अंदमान-निकोबारमध्ये नौदलाच्या कवायती
3 भारतात करोनाचा उद्रेक; २४ तासांत ३४,८८४ नवे रुग्ण, ६७१ जणांचा मृत्यू
Just Now!
X