राजस्थानमधील सीकर जिल्ह्यामधील फतेहपुरी विभागामध्ये काही दिवसांपूर्वी एक करोना संक्षयित रूग्ण अढळून आला. त्यानंतर प्रशासनातील आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाची पहाणी केली. मात्र गावकऱ्यांनी गावामध्ये फवारणी करण्याची मागणी केली. अनेक दिवस फवारणी करण्याची मागणी करुनही प्रशासनाने ही मागणी मान्य न केल्यामुळे गावातील लोकांनी प्रशासानचा निषेध केला आहे. यासाठी गावातील अनेक पुरुषांची स्वत:चे केस कापून मुंडन करुन घेतले आहे.

मिळालेल्य माहितीनुसार फतेहरपुरमधील बटडानाऊ गावामध्ये एक संक्षयित रुग्ण अढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी लॉकडाउननंतर गावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावच्या संरपंच असणाऱ्या बालीदेवी बाटड यांनी केला आहे. गावात प्रशासनाचा एकही कर्मचारी आला नाही. आम्हाला रेशनही वाटण्यात आलं नाही, असा आरोप सरपंचांसहीत स्थानिक लोकप्रितिनिधींनी केला आहे. या प्रकरणामध्ये येथील उपखंड अधिकारी कुलराज मीणा यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन गावकऱ्यांना दिलं आहे.

दुसरीकडे अजमेर जिल्ह्यामधील सरवाड परिसरातील क्वाजा फखरुद्दीन हसन चिश्ती सरवाडी यांच्या वार्षिक उर्सूमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचलेल्या सहा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अजमेर दर्गातील शरीफ अंजुमन कमिटीने मंगळवारी येथे परंपरेप्रमाणे चादर अर्पण केली. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दहा लोकं उपस्थित राहू शकतात अशी परवानगी स्थानिक प्रशासनाने दिली होती. मात्र या कार्यक्रमाच्या ठिकाणी ६० हून अधिक जण उपस्थित होते. यासंदर्भातील माहिती कमिटीने पोलिसांनी दिली. त्यानंतर सरवाड पोलीस स्थानकातील अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि कलम १४४ लागू असल्याने इतक्या लोकांना इथं एकत्र थांबता येणार नाही अस सांगत जमावाला पांगवले. मात्र त्यापैकी सहा लोकांनी परत जाण्यास नकार दिल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.