22 September 2020

News Flash

‘सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना तुरुंगात पाठवा’

प्रेमी युगुलांबाबत साक्षी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

साक्षी महाराज (संग्रहित फोटो)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा असेच वक्तव्य केले आहे. मोटरसायकल असो, कार असो, पार्क असो वा रस्ता किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतेही प्रेमीयुगुल, मिठ्या मारताना किंवा अश्लील चाळे करताना आढळले तर अशा प्रेमी युगुलांना तुरुंगात पाठवा, असा सल्लाच साक्षी महाराजांनी दिला. राजस्थानातील भरतपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.

अश्लील चाळे करणाऱ्या या जोडप्यांकडे सगळेच दुर्लक्ष करतात. मात्र जेव्हा बलात्कार होतो तेव्हा लोक पोलिसांकडून कारवाईची मागणी केली जाते. कारवाईची मागणी करणे मुळीच चूक नाही. मात्र अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने  या संदर्भातले वृत्त दिले.

राम रहिमशी संबंध नाही

बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमबाबत साक्षी महाराजांनी आता भूमिका बदलली आहे. राम रहिम आणि आपला काही संबंध नाही असे त्यांनी म्हटले. काँग्रेस आणि इतर पक्षांनी असल्या बुवा-बाबांना डोक्यावर बसवले. अनेक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी भोंदूबाबांचा आश्रय घेतात असाही आरोप त्यांनी केला. बाबा राम रहिमला जेव्हा दोषी ठरवण्यात आले तेव्हा साक्षी महाराजांनी त्याची बाजू घेतली होती. आता मात्र त्यांनी आपली भूमिका बदलून राम रहिमशी संबंधच नसल्याचे स्पष्ट केले.

रोहिंग्या मुस्लिमांना अाश्रय नको

रोहिंग्या मुस्लिमांना देशात आश्रय द्यायला नको, प्रश्न हा आहे की त्यांनी भारतात प्रवेश केलाच कसा? म्यानमारमधून आलेल्या या रोहिंग्यांना तातडीने बाहेर काढले पाहिजे असे मत साक्षी महाराजांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2017 9:11 pm

Web Title: couples displaying affection in public should be jailed says sakshi maharaj
Next Stories
1 विकास हा शब्दच विरोधकांना आवडत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निशाणा
2 ‘महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर अनिवासी भारतीय’
3 ‘उबर’ला दणका, लंडनमधून हद्दपार ?
Just Now!
X