News Flash

निठारी हत्याकांड : आरोपी कोळीला फाशीची शिक्षा

निठारी हत्याकांडप्रकरणी गझियाबाद सत्र न्यायालयाने आरोपी सुरिंदर कोळी याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

| September 4, 2014 03:46 am

निठारी हत्याकांडप्रकरणी गझियाबाद सत्र न्यायालयाने आरोपी सुरिंदर कोळी याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. रिम्पा हलदर या १४ वर्षीय युवतीची निर्घृण हत्या कोळी याने केली होती. राष्ट्रपतींनी २७ जुलै रोजी कोळी याचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. स्वबचावाचा कोणताही कायदेशीर पर्याय कोळी याच्याकडे राहिलेला नसल्याने त्याला फाशी द्यावे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अतुलकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले.
कोळी याला फाशी देण्याची तयारी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना उत्तर प्रदेश सरकारला देण्यात आल्या आहेत. सत्र न्यायालयाने १२ सप्टेंबर ही फाशीची तारीख निश्चित केली आहे. मात्र उत्तर प्रदेश प्रशासनाशी चर्चा करून फाशीचा दिवस निश्चित केला जाणार आहे.
कोळी याचा दयेचा अर्ज फेटाळावा, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी यापूर्वी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना केली आहे. राष्ट्रपतींनी २७ जुलै रोजी कोळी याचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे कोळीला फासावर लटकविण्यासाठीची न्यायिक प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोळी याच्याविरोधात हत्येचे ११ गुन्हे प्रलंबित असल्याने त्याला त्वरित फाशी देण्यात येणार आहे की नाही, त्याबाबत स्पष्टीकरण होऊ शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:46 am

Web Title: court issues death warrant against koli in nithari case
Next Stories
1 कोळसा खाणवाटप करताना कंपन्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय
2 लोकपाल शोध समितीचे नवे नियम अधिसूचित
3 सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात अटक वॉरंट
Just Now!
X