News Flash

अरविंद केजरीवाल जहालमतवाद्यांना प्रोत्साहन देत आहेत- राहुल गांधी

राहुल गांधी यांनी आप, शिरोमणी अकाली दल आणि भाजपवर कडाडून टीका केली

राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला ( संग्रहित छायाचित्र)

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जहालमतवाद्यांना प्रोत्साहन देत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.  राहुल गांधी यांचा इशारा खलिस्तानवाद्यांकडे होता. अरविंद केजरीवाल हे या शक्तींना मदत करत आहेत असे राहुल यांनी पंजाबमधील प्रचारसभेत म्हटले.

या शक्तींना उभे राहण्यास अरविंद केजरीवाल मदत करत आहेत असे राहुल यांनी म्हटले.  काँग्रेस उमेदवार हरमिंदर सिंग जस्सी यांच्या भटिंडा येथील प्रचारसभेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये सहा लोकांचे प्राण गेले. हा स्फोट खलिस्तानवाद्यांनी केला आणि अरविंद केजरीवाल हे अशा लोकांना प्रोत्साहन देत आहेत असे राहुल म्हणाले.

राहुल यांनी शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षावरही टीका केली. जेव्हा पंजाबी लोक गरिबीमध्ये राहत आहेत त्याच वेळी बादल परिवार मात्र ऐशोआरामात जीवन जगत आहे असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि एसएडीच्या काळात पंजाबने ड्रग्जविरुद्धचा लढा पूर्णतः हरला आहे असे ते म्हणाले. जर पंजाबमध्ये सत्ता आली तर आम्ही ड्रग्जचा प्रश्न पूर्णपणे सोडवू असे ते म्हणाले.  गुरू नानक यांचा संदर्भ देऊन त्यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला. गुरू नानकची हे तेरा तेरा असं म्हणत असत परंतु आप सरकार मात्र केवळ मेरा मेरा असं म्हणते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 2:05 pm

Web Title: delhi chief minister arvind kejriwal rahul gandhi punjab election sangrur rally
Next Stories
1 ‘काँग्रेसने गरीब-श्रीमंतात निर्माण केलेली दरी अर्थसंकल्पातून दूर करण्याचा प्रयत्न’
2 ट्रम्प म्हणाले, ‘वाईट लोकांना’ अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठीच बंदी
3 सव्वाशे कोटी भारतीयांमध्ये फक्त ७६ लाख लोकांचे वेतन ५ लाखांहून अधिक
Just Now!
X