दिल्लीत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने कमी होत आहे. दिल्लीत रविवारी ३८१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली . १५ मार्चनंतर सर्वात कमी रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. तर एका दिवसात ३४ जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीत शनिवारी सुद्धा ४१४ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर ६० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे करोना रुग्णवाढीचा दर हा ०.५ टक्क्यांच्या खाली आला आहे. ९ मार्चनंतर रुग्णावाढीची टक्केवारी सर्वात कमी आहे. त्यामुळे दिल्लीकरांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दिल्लीत शनिवार-रविवार दरम्यानं एकूण ७६ हजार ८५७ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात ५५ हजार ७८६ जणांची आरटी पीसीआर आणि २१ हजार २१ जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. आतापर्यंत एकूण १ कोटी ९७ लाख ५८ हजार ३१५ जणांची चाचणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रुग्णालात एकूण २४ हजार ३०३ खाटा आहेत. त्यापैकी २ हजार ९३६ खाटांवर रुग्ण भरती आहेत. तर २१ हजार ३६७ खाटा रिकामी आहेत. दिल्लीत मागच्या २४ तासात ५८ हजार ९१ जणांचं लसीकरण करण्यात आलं. त्यापैकी ४२ हजार ८२३ जणांना लसीचा पहिला डोस तर १५ हजार २६८ जणांना करोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत एकूण ५६ लाख ५० हजार ८१९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी एकूण ४३ लाख ६६ हजार २ जणांनी लसीचा पहिला डोस, तर १२ लाख ८४ हजार ८१७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

एचआयव्हीग्रस्त महिलेच्या शरीरात करोना विषाणूने ३२ वेळा बदलली रचना

दिल्लीत अनलॉकची प्रक्रिया

दिल्लीत उद्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. दिल्लीत सम विषम या योजनेनुसार दुकानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कार्यालयात ‘अ’ गटातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असेल. खासगी कार्यालयं ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेट्रो ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास सांगितलं आहे. या आठवड्यातील करोना रुग्णवाढीच्या दरावर पुढे काय सवलती द्यायचं हे अवलंबून असेल असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

‘घर घर राशन’ योजनेच्या स्थगितीवरून भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप!

तिसऱ्या लाटेसाठी दिल्ली सरकार सज्ज

तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधून दिल्ली सरकारने तयारी सुरु केली आहे. दिल्लीत प्रतिदिन ३७ हजार रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज समोर ठेवून रणनिती आखण्यात आली आहे. बेड, ऑक्सिजन, औषधं आणि आयसीयू याची तयारी केली जात आहे. लहान मुलांना करोनाची बाधा होईल असं तज्ज्ञांनी सांगितल्याने मुलांसाठी आयूसीयू बेडचं प्रयोजन केलं जात आहे. त्याचबरोबर ४२० टन ऑक्सिजनसाठी स्टोरेज तयार करण्यात येत आहे.