उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तीन मतदान केंद्रांवर फेरमतदान फेरमतदान होणार आहे. उद्या येथे पुन्हा मतदान घेण्याचे आदेश, निवडणूक आयोगाने दिले आहेत.
जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश इंदरमणी त्रिपाठी म्हणाले, की उद्या जिल्ह्यातील तीन मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराकडून गैरप्रकार केल्याची तक्रार झाल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दंगलीची घटना घडूनही मुझफ्फरनगरमध्ये घडूनही १० एप्रिलला ६८.२७ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी येथील बसपचे उमेदवार कादीर राणा यांनी गैरप्रकार केल्याची तक्रार करण्यात आली होती. याठिकाणाहून समाजवादी पक्षाचे (सप) वीरेंद्र सिंग, भाजपचे संजीव बलयान आणि काँग्रेसचे पंकज अग्रवाल निवडणूक रिंगणात आहेत.