03 March 2021

News Flash

जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी; पाच हजार वर्षापूर्वीचं रहस्य उघड

दफनभूमीत बिअरची निर्मिती

इजिप्त हा देश प्राचीन संस्कृती आणि रहस्यमय वास्तूंसाठी ओळखला जातो. इजिप्तमध्ये हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या अनेक वास्तू आहेत. यात गिझाचे पिरॅमीड, देवदेवतांची हजारो वर्षांपूर्वीची मंदिर, थडगी, ममीज् असा मोठा एतिहासिक खजिना या देशात आहे.

नुकत्याच एका संशोधनात इजिप्तमध्ये एका पुरातन बिअर फॅक्टरीच्या अवशेषांचा शोध लागला आहे. ही बिअर फॅक्टरी पाच हजार वर्ष जुनी असल्याचा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. एबिडोस इथल्या दफनभूमीत इजिप्त आणि अमेरिकेच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खननाचं काम हाती घेतलं आहे. या दफनभूमीत उत्खनन करत असताना काही पुरातन अवशेष हाती लागले असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. उत्खननात सापडलेल्या बिअर फॅक्टरीचा फोटो इजिप्त सरकारनं शेअर करत ही माहिती दिली आहे.

Facebook-इजिप्त पर्यटन आणि पुरातत्व विभाग)

एबिडोस इथल्या उत्खननादरम्यान ४0 मोठी मातीची भांडी सापडली आहेत. दोन रांगांमध्ये ही मातीची भांडी रचून ठेवल्याचं आढळून आलं. इजिप्त आणि अमेरिकेतील पुरातत्व शास्त्रज्ञांचं पथक एबिडोसच्या दफनभूमीत उत्खनन करत असताना मातीच्या भांड्यांचे अवशेष त्यांच्या हाती लागले.

इजिप्तच्या पुरातत्व खात्याचे सरचिटणीस मुस्तफा वजीर यांनी या उत्खननासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. मातीचे रांजण असलेली अशी आठ कोठारं उत्खननात सापडली आहेत. बिअरच्या निर्मितीसाठी धान्य आणि पाणी मोठ्या भांड्यांमध्ये साठवून ठेवणं गरजेचं असतं. यासाठीच ही मातीची भांडी वापरली जात असावी असं मत आभ्यासकांनी मांडलंय. 5 हजार वर्षांपूर्वी एबिडोसच्या या भागात राजा नारमेर याचं राज्य होतं आणि याच काळातील हे अवशेष असल्याचं वजीर यांनी नमूद केलं आहे.

दफनभूमीत बिअर फॅक्टरी !
इजिप्तमधील एबिडोसमध्ये स्मशानभूमीत बिअर फॅक्टरीचे अवषेश सापडल्यानं आश्र्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हे अवशेष स्मशानभूमीत सापडण्यामागची कारणमीमांसा आभ्यासकांनी केली आहे. प्राचीन काळात इजिप्तमधील लोक पुर्नजन्मात विश्वास ठेवत होते. या काळात राजघराण्यातील सदस्यांचे अत्यसंस्कार मोठ्या थाटामाटात पार पडत असल्याचे अनेक पुरावे इजिप्तच्या इतिहासात आढळतात. अत्यंसंस्काराच्या राजेशाही सोहळ्यात मद्यपानाची सोय या बिअर फॅक्टरीतून होत असावी असं या उत्खननातील आभ्यासक डॉ. मॅथ्यू अॅडम्स यांनी सांगितलं आहे. या उत्खननात धान्य साठवणूकीच्या भांड्यांसोबतच यज्ञसंस्कारांच्या साहित्याचे अवशेषदेखील सापडले आहेत.

Facebook-इजिप्त पर्यटन आणि पुरातत्व विभाग)

19 व्या शतकात ब्रिटनच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी प्राचीन काळात या प्रकारच्या बिअर फॅक्टरी अस्तित्वात असल्याचा उल्लेख केला होता. मात्र या फॅक्टरी नेमक्या कुठे आहेत याचा शोध लावणं त्यांना शक्य झालं नव्हतं. अथक प्रयत्नांनंतर अमेरिका आणि इजिप्शियन पुरातत्व शास्त्रज्ञांच्या पथकाला एबिडोसमधील बिअरची कोठारं शोधण्यात मोठं यश हाती आलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 10:37 am

Web Title: egyptian american archaeologists discover oldest beer factory in egypt kw89
Next Stories
1 “कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल”, दिशा रवीच्या अटकेवरुन शशी थरुर यांनी साधला निशाणा
2 ‘ग्रेटा टूलकिट’ प्रकरण : न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे आले भरून; म्हणाली…
3 बिहार : सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणारे अटकेत
Just Now!
X