News Flash

काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन जवान जखमी

लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू

जम्मू काश्मीरमधील बांदिपोरामध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. जवानांवर हल्ला करुन दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. बांदिपुरामधील शाहगुंड हाजी परिसरात पहारा देणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.

शाहगुंड हाजी परिसरातील लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काही वेळ चकमक झाली. शाहगुंड हाजी हा परिसर बांदिपोरा जिल्ह्यात येतो. लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटरमध्ये मारला गेला. यासोबतच आणखी एका चकमकीत काश्मीर खोऱ्यातील इंजिनियरिंगचा विद्यार्थी असलेल्या आणि नुकत्याच लष्कर दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या एका तरुणाला भारतीय लष्कराने टिपले होते. लष्कराचे जवान आणि पोलीस यांच्या या संयुक्त कारवायांच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून हा करण्यात आला असल्याची दाट शक्यता आहे.

भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षीय दहशतवादी अबू बकेरला कंठस्नान घातले. अबू बकेर लष्कर ए तोयबाचा विभागीय कमांडर होता. अबूला टिपण्यात आल्याने लष्कर ए तोयबाला मोठा धक्का बसला आहे. सोपोरमधील एन्काऊंटरमध्ये लष्कराच्या जवानांनी अबू बकेरला कंठस्नान घातले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 9:03 am

Web Title: encounter between security forces and terrorists in bandipora 2
Next Stories
1 ‘सीआरझेड’च्या कचाटय़ातून इंदू मिलची सुटका
2 काळ्या पैशांचा हिशेब द्या!
3 जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक!
Just Now!
X