News Flash

विधवा वहिनीसोबत लग्न करण्याची जबरदस्ती केल्याने तरुणाची आत्महत्या

खाप पंचायतीचा आणखी एक बळी

छायाचित्र संग्रहीत आहे

खाप पंचायतीकडून आपल्याच विधना वहिनीसोबत लग्न करण्याची शिक्षा देण्यात आल्यामुळे झारखंडमधील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री झारखंडच्या रामगढ मधील रोला बगिचा भागात हा प्रकार घडला. लव कुमार असं मृत तरुणाचं नाव असून, दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध उघडकीस आल्यामुळे खाप पंचायतीने लव कुमारला शिक्षा म्हणून आपल्याच विधवा वहिनीसोबत लग्न करण्याची शिक्षा सुनावली होती.

लव कुमारचे वडिल सुखलाल महातो यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. खाप पंचायतीने सुचवलेल्या शिक्षेनंतर बिथरलेल्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लव कुमारच्या परिवाराने केलेल्या आरोपांची चौकशी होऊन, दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. लव कुमारचा मृतदेह ऑटोप्सीकरता पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईला वेग येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:45 pm

Web Title: forced by khap to marry bhabi as punishment for a love affair with another woman youth hangs himself to death psd 91
Next Stories
1 करोना पॉझिटिव्ह महिलेनं उपवास करण्यास नकार दिल्यानं रुग्णालयाच्या इमारतीवरून घेतली उडी
2 अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार करुन सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ
3 व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी बायडेन यांना हवी फक्त सहा मतं, ती ‘या’ राज्यातून मिळू शकतात
Just Now!
X