देशात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत. आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देखील करोनाच संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, करोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही केली आहे.

Corona Crisis: मनमोहन सिंगांचं मोदींना पत्र, पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनमोहन सिंग यांनी पत्रातून मोदी सरकारला करोनाविरोधातील लढाईसाठी पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला देखील दिला आहे.  या पाच कलमी कार्यक्रमात, १. पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे २. राज्यांना अपेक्षित असेलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत ३. राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी. ४. लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्या ५. वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी या मुद्यांचा समावेश आहे.