News Flash

कोविड रुग्णालयात बाधित महिलेवर सामूहिक बलात्कार; महिला आयोगाने दिले चौकशीचे आदेश

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी बिहारच्या मुख्य सचिवांना लिहिले पत्र

प्रातिनिधिक

बिहारमधील करोना पॉझिटिव्ह महिलेसोबत सामूहिक बलात्कार प्रकरणात चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिहारमधील खासगी रुग्णालयात करोना पॉझिटिव्ह महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या बातम्या माध्यमांसमोर आल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे महिला आयोगाने सांगितले. तसेच करोना काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंतीत असल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी बिहारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना आणि रुग्णालयाला योग्य निर्देश देण्यास सांगितले.

पटनातील एका मोठ्या खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये करोनावर उपचार घेत असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. रुग्णालयाच्या तीन ते पाच कर्मचार्‍यांनीच या महिलेवर बलात्कार केला. जेव्हा मुलीने पीडित महिलेच्या विधानाचा एक व्हिडिओ बनवला आणि फेसबुकवर अपलोड केला. तर खळबळ माजली होती.

पोलिसांनी अद्याप या घटनेची पुष्टी केली नसून तपास सुरु असल्याचे सांगितले. रुग्णालय व्यवस्थापनाने संपूर्ण प्रकरण निराधार व खोटे असल्याचे म्हटले आहे.

ही घटना पाटण्यातील खासगी रुग्णालयात घडली. करोना बाधित महिलेला बर्‍याच दिवसांपासून येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेवर रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा मुलगी आईला भेटायला आयसीयूमध्ये पोहोचली. तेव्हा तिच्या आईने झालेली घटना सांगितली. त्यानंतर मुलीने त्वरित आपला मोबाइल बाहेर काढला आणि आईच्या बोलण्याचा व्हिडिओ बनविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 9:41 am

Web Title: gang rape of a woman affected by corona in bihar srk 94
Next Stories
1 पंतप्रधानांची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक लाइव्ह दाखवताना प्रोटोकॉल तुटला नाही का?; ‘आप’चा सवाल
2 मुलांसाठी घातक ठरणारा नवा स्ट्रेन भारतातीलच; केजरीवालांच्या ‘त्या’ ट्विटवर सिंगापूर दूतावासाचं उत्तर
3 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला! जाणून घ्या दर…