उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून विरोधकांकडून टीका होत असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारची भूमिका मांडताना संवादातून समस्या सोडवण्यावर जोर दिला. त्याचबरोबर विरोधकांवर गंभीर आरोपही केला होता. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या या आवाहनावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे.

हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेशातील व देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून हाथरस प्रकरणावरून विरोधक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत आहे. त्यावर बोलताना योगी आदित्यानाथ यांनी संवादातून समस्या सोडवण्यावर जोर दिला. योगी आदित्यनाथ यांच्या संवादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांचा दावा

“काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री साहेबांनी संवादातून समस्यांवर उपाय शोधण्याची गोष्ट केली. मग आता ते पीडित कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेणार का? हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार? न्यायालयीन चौकशीचे आदेश कधी देणार? पीडितेची व्यथा ऐकून घेणं ही न्यायाची पहिली पायरी आहे. पण वस्तुस्थिती अशाी आहे की भाजपाच आज पीडितेविषयी वाईट प्रचार करत आहे,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

आणखी वाचा- सरकारनं हुकुमशाही व अहंकारी वृत्ती सोडावी, अन्यथा…; मायावतींचा योगी सरकारला सल्ला

आणखी वाचा- ‘त्या’ गैरवर्तनाबद्दल प्रियंका गांधींची पोलिसांनी मागितली माफी; म्हणाले,…

“ज्यांना विकास आवडत नाही ते लोकं देशात व राज्यात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आडून विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल, यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाल ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. संवादातून समस्यांवर उपाय शोधायचे आहे,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.