करोना महामारी विरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईच्यादृष्टीने आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा आज देशात शुभारंभ झाला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधून, या लसीकरणास सुरूवात करून दिली. मात्र, देशात सुरू असलेलं लसीवरचं राजकारण अद्याप थांबलेलं दिसत नाही. एकीकडे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होताच, दुसरीकडे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदी सरकारला लसीकरणावरून काही प्रश्न विचारले आहेत.

… अखेर तो दिवस उजाडला! आजपासून देशभरात प्रत्यक्ष लसीकरणाची सुरूवात

“लस जर एवढीच सुरक्षित आणि विश्वसनीय आहे व तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यापलिकडची आहे. तर, मग असं कसं होऊ शकतं? की सरकारशी निगडीत कुणीही लस टोचून घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जगातील अन्य देशांमध्ये असं झालं आहे.” असा प्रश्न मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

“अनेक नामांकीत डॉक्टारांनी कोव्हॅक्सिनच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. संपूर्ण जगात अनेक नेत्यांनी पुढे येत स्वतः लस टोचून घेतली आहे. मात्र, भारत सरकारशी निगडीत कोणीही असं का केलं नाही?” असं मनीष तिवारी म्हणाले आहेत.

करोना विरोधातील लढ्यात ही लस ‘संजीवनी’ म्हणून काम करेल – डॉ. हर्षवर्धन

तसेच, “मनीष तिवारी यांनी लशींच्या वापरास मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यासाठी काही धोरणात्मक चौकट नाही. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी सरकारसमोर कोव्हॅक्सिनची परिणामकारकता आणि सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, कोणती लस घ्यावी याची निवड नागरिकांना करता येणार नाही.” असं देखील मनीष तिवारी यांनी बोलून दाखवलं आहे.

लसीकरणाबद्दल पंतप्रधान मोदींचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन; म्हणाले…

तर, ”आपल्या शास्त्रज्ञांना आणि तज्ज्ञांना जेव्हा मेड इन इंडिया लसीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल खात्री झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे देशवासीयांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि चुकीच्या प्रचारापासून सावध राहावं. भारतातील लस निमिर्ती करणारे शास्त्रज्ञ, आपली वैद्यकीय प्रणाली आणि भारतातील प्रक्रियेवर संपूर्ण जगाला विश्वास आहे. आपण हा विश्वास आपल्या पूर्वीच्या कामांपासून संपादीत केला आहे,” असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी लसीच्या सुरक्षिततेबद्दल भारतीयांना आज पुन्हा एकदा आश्वस्त केलं आहे.

कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण…; मोदींनी विरोधकांनाही दिलं प्रत्युत्तर

करोनाच्या लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधकांनी लसीच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला होता. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींनी सर्वात आधी करोनाची लस घ्यावी, अशी मागणीही केली होती. त्यामुळे यावरून वादंग निर्माण झालं होतं.