News Flash

भारतात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद; गेल्या पाच महिन्यातील उच्चांक

भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे

संग्रहित (PTI)

भारतात गेल्या २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यासोबतच भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात गुरुवारी २३ ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २१ तासात भारतात ५३ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले असूण २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

भारतात सध्याच्या घडीला रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ रुग्णांवर पोहोचली असून १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार १९२ इतकी असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात
“सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे,” अशी माहिती बुधवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 10:02 am

Web Title: india reports 53476 new covid19 cases sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे,” शिवसेनेची परखड टीका
2 देशाला टाळेबंदीनंतरच्या बेरोजगारीतून सावरण्याची प्रतीक्षा
3 दुहेरी उत्परिवर्तनांच्या करोना विषाणूंचा भारतात आढळ
Just Now!
X