News Flash

भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी!

भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

फोटो सौजन्य - एएनआय

भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका खुनाच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. मात्र, ही घटना उघड झाल्यापासून सुशील कुमार पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे सुशील कुमार सापडताच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. ४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या आवारात सागर राणा या २३ वर्षीय कुस्तीपटूची हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोलीस सुशील कुमार याच्यासह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

 

“छत्रसाल स्टेडियममध्ये आलेले ते आमचे कुस्तीपटू नव्हते. आम्ही त्यासंदर्भात पोलिसांना देखील माहिती दिली आहे. काही अज्ञात लोकांनी आमच्या स्टेडिममध्ये अवैधरीत्या प्रवेश केला आणि आमच्याशी वाद घातला. या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया सुशील कुमारने यासंदर्भात पोलिसांशी बोलताना दिली होती. मात्र, तेव्हापासून सुशील कुमार गायब आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा सागर राणा याच्यासोबत वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सुशील कुमारने वेगळी भूमिका मांडली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फूटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.

 

सागर सुशीलला गुरू मानायचा!

दरम्यान, या सर्व प्रकारावर सागर राणाच्या वडिलांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रसालमध्ये सागर जवळपास ८ वर्षांपासून जातोय. तो सुशीलला त्याचा गुरू मानायचा. मी माझ्या मुलाला छत्रसाल आखाडा चालवणाऱ्या महाबली सतपाल यांना सोपवलं होतं. त्यांनी मला सागरला चांगला कुस्तीपटू बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याने अनेक पदकं जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. पण गुरू असूनही…..!” अशा शब्दांत अशोक धनखार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशोक धनखार स्वत: दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 6:58 pm

Web Title: indian olympic medalist sudhil kumar non bailable warrant in sagar rana murder case pmw 88
Next Stories
1 रॉकेट हल्ल्यात गाझापट्टीत १० ठार; इस्रायलविरोधात अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली
2 पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – सरसंघचालक मोहन भागवत
3 राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरर्सचं ऑडिट करा; पंतप्रधानांकडून आदेश
Just Now!
X