वाराणसी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उदघाटन केले. आता गंगा नदीमार्गे देशातंर्गत मालवाहक जहाज सेवा सुरु झाली आहे.

– गंगा-भागीरथ-हुगली हा सागरी मार्ग  राष्ट्रीय जलमार्ग १ म्हणून घोषित करण्यात आला.

– कोलकाता येथून आलेल्या एम.व्ही.रविंद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून १६ कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले. १६ कंटेनर म्हणजे १६ ट्रकच्या बरोबरीचा हा माल आहे. आता परतीच्या प्रवासात हे जहाज IFFCO च्या प्रकल्पात निर्मिती करण्यात आलेली खते घेऊन जाईल.

– वाराणसीच्या खिडकिया घाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पहिला मल्टी मॉडेल टर्मिनल राष्ट्राला समर्पित केला.

– २०६ कोटी रुपये खर्चून हा मल्टी मॉडेल टर्मिनल बांधण्यात आला आहे. २०० मीटर लांब ४५ मीटर रुंद असलेल्या या जेट्टीवर माल चढवणे आणि उतरवण्यासाठी जगातील अत्याधुनिक क्रेन बसवण्यात आली आहे. जर्मनीमध्ये बनवण्यात आलेल्या या क्रेनची किंमत २८ कोटी रुपये आहे.

– या जलमार्गामुळे व्यापार-व्यवसाय अधिक अनुकूल होणार असून जलमार्ग विकास प्रकल्पातंर्गत हा मार्ग बांधण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

– देशातंर्गत जलमार्गाने मालवाहतूक पर्यावरणपूरक असून त्यामुळे खर्चात बचत होईल.

– मल्टी मॉडेल टर्मिनलमुळे थेट ५०० नोकऱ्या आणि २ हजार अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे.

– या जलमार्गामुळे पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर भारत थेट बंगालच्या खाडीशी जोडला जाणार आहे – नरेंद्र मोदी</p>

– कोलकता ते वाराणसी हा एकूण १३ दिवसांचा प्रवास आहे. १६ कंटेनरमध्ये पेप्सिको कंपनीचा माल होता.