News Flash

‘आयआरसीटीसी’कडून रेल्वे तिकीट सेवाशुल्कात दुप्पट वाढ

'आयआरसीटीसी'च्या माध्यमातून रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षित करणे आता महागले आहे.

| April 17, 2015 11:52 am

‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षित करणे आता महागले आहे. ‘आयआरसीटीसी’ने तिकीट आरक्षणावरील सेवाशुल्कात दुप्पटीने वाढ केल्यामुळे प्रवाशांना त्याचा भार सोसावा लागणार आहे. आतापर्यंत स्लीपर वर्गासाठी १० आणि वातानुकूलित वर्गासाठी २० रुपये सेवाशुल्क आयआरसीटीसी आकारत होते. त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. एप्रिलपासून स्लीपर वर्गासाठी २० रुपये तर वातानुकूलित वर्गासाठी ४० रुपये सेवाशुल्क मोजावे लागते आहे.
रेल्वे मंडळाच्या परवानगीनंतर आयआरसीटीसीने तिकीट आरक्षण सेवाशुल्कात वाढ केली. यामुळे आयआरसीटीसीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 11:52 am

Web Title: irctc increased railway ticket service charges
टॅग : Railway Ticket
Next Stories
1 मसरत आलमला जम्मू-काश्मीर पोलीसांकडून अटक
2 तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधानांची ‘घरवापसी’
3 जुनी कसर भरून काढण्यासाठीच मोदींचे सातत्याने परदेश दौरे – येचुरी
Just Now!
X