News Flash

व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजेच्या आधारे मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेता येणार नाही : भारत सरकार

मुलांच्या लसीकरणाला जगामध्ये कोणत्याच देशाने परवानगी दिलेली नसल्याचा मोदी सरकारचा दावा

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : रॉयटर्स)

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भातील चर्चाही सुरु झाल्या आहेत. असं असतानाच आता केंद्र सरकारने दावा केला आहे की जगातील कोणत्याच देशामध्ये लहान मुलांचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. गुरुवारी सरकारी दिलेल्या माहितीनुसार लवकरच लहान मुलांवरील लसीच्या चाचण्यांची सुरुवात होणार आहे. तसेच केंद्राने लहान मुलांच्या लसीकरणावरुन सुरु असणाऱ्या राजकारणावरही नाराजी व्यक्त केलीय.

केंद्र सरकारने गुरुवारी भारतामधील लसीकरण मोहीमेसंदर्भातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने एक पत्रक जारी केलं आहे. हे पत्रक निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य आणि लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय समितीचे प्रमुख विनोद पॉल यांच्या नावाने जारी करण्यात आलं आहे. या पत्रकानुसार जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात कोणताही सल्ला दिलेला नाही. देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजलेला असतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केलाय. या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाचा विषय चर्चेत आलाय. मात्र मुलांच्या लसीकरणासंदर्भातील चाचण्या लवकरच सुरु होणार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. तसेच वर्षाअखेरीसपर्यंत २०० कोटींहून अधिक लसींचे डोस भारतीयांसाठी उपलब्ध असतील असंही केंद्राने म्हटलं आहे.

सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार सरकार २०२० च्या सुरुवातीपासूनच अनेक कंपन्यांना लसींचे उत्पादन घेण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी एक प्रभावी सुत्रधार म्हणून भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. मुलांच्या लसीकरणासंदर्भात सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार चाचण्यांनंतर योग्य निरिक्षणे आणि माहिती उपलब्ध झाल्यावर देशातील वैज्ञानिकांच्या मदतीने लस निर्मितीचं काम हाती घेतलं जाईल. तसेच व्हॉट्सअप ग्रुपवरील भीती पसरवणाऱ्या मेसेजेच्या आधारे लसीकरण मोहीमेबद्दल निर्णय घेता येणार नाही. राजकीय नेते या मुद्द्यावरुन राजकारण का करत आहेत, असा प्रश्न केंद्राने उपस्थित केलाय.

इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार भारत बायोटेक दोन ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या लसीच्या चाचण्यांचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल ट्रायल जून महिन्यामध्ये सुरु करणार आङेत. काही दिवसांपूर्वी कंपनीला दोन ते १८ वर्षांच्या मुलांवर चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने संयुक्तरित्या ही लस बनवली आहे.

फायझर या अमेरिकन कंपनीने त्यांची लस १२ वर्षांवरील व्यक्तींना देता येऊ शकते असं म्हटलं आङे. कॅनडामध्ये १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायझरची लस देण्यास पवानगी दिलीय. निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी भारत सरकार परदेशी लस निर्मिती कंपन्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 4:05 pm

Web Title: is the centre not taking any step to vaccinate children goi answers scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदी सरकार २.० सर्वेक्षण – नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला ‘तो’ निर्णय चुकलाच!
2 अरे देवा! हा ट्रेनचा वेग की चक्रीवादळाचा…?; रेल्वे स्टेशनच प्लॅटफॉर्मवर कोसळलं
3 मोदी २.० सरकार सर्वेक्षण : हो, मोदी सरकारने करोनापेक्षा निवडणुकांना दिलं अधिक महत्त्व
Just Now!
X