25 February 2021

News Flash

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षा ३ जुलैला होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार

संग्रहीत

‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ परीक्षेच्या तारेख संदर्भात आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार ३ जुलै २०२१ रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. यावेळी पोखरियाल यांनी आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता आणि नियमांबाबत देखील माहिती दिली.

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या घोषणेची प्रतीक्षा होती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’  परीक्षा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

या परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना पोखरियाल यांनी सांगितले की, आपण अद्याप पूर्णपणे करोनाच्या संकटातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. याची विद्यार्थ्यांना मदत होईल. आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 9:54 pm

Web Title: jeeadvanced 2021 will be conducted on 3rd july 2021 msr 87
Next Stories
1 ‘महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती, तर बलात्कार टळला असता’ NCW सदस्याचे वक्तव्य
2 कर्नाटकात समाजातंर्गत विवाह करणाऱ्या ब्राह्मण वधूला मिळणार आर्थिक मदत
3 पुणे ठरणार भारतातील करोना लसीकरणाचा केंद्रबिंदू
Just Now!
X