21 September 2020

News Flash

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या कंगनाच्या चाहत्याला बेड्या, कोलकातामध्ये कारवाई

आज न्यायालयात हजर करण्यात येणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संतप्त लाट उसळली होती. या प्रकरणात कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. या पार्श्वभूमिवर  कंगनाच्या एका चाहत्यानं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना धमकी दिली होती. कंगनाच्या या चाहत्याला कोलकातामधून अटक करण्यात आली आहे.

कंगनाच्या या चाहत्याचं नाव पलाश घोष असे आहे. या चाहत्याला गुरुवारी रात्री मुंबई एटीएसने दक्षिण कोलकाताच्या टॉलीगुंगे परिसरातून अटक केली आहे. पलाश घोष याला मुंबईला आणण्याची आता तयारी सुरु आहे. संजय राऊत यांना व्हिडीओ कॉलवर धमकी देण्याचा पलाश घोष यांच्यावर आरोप आहे. पलाश याला आज अलिपूर कोर्टात हजर करण्यात येणार असून ट्रांजिट रिमांडची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कोलकाता पोलिसातील एका उच्च अधिकाऱ्यानं दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 3:32 pm

Web Title: kangana ranaut fan arrested in kolkata for threatening sanjay raut nck 90
Next Stories
1 “गरज पडली तर आम्ही शिमल्यातील प्रियंका गांधींचं घरही पाडू”; भाजपाच्या महिला नेत्याचे वक्तव्य
2 धक्कादायक, श्री अराकेश्वरा मंदिरातील तीन पुजाऱ्यांची दगडाने ठेचून हत्या
3 अभिनेत्री कंगना रणौतला झेड प्लस सुरक्षा देण्याची भाजपा आमदाराची मागणी
Just Now!
X