News Flash

सूरतमध्ये परप्रांतीय कामगार पुन्हा रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक

१०० कामगार पोलिसांच्या ताब्यात

देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. याचसोबत इतर राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठीही रेल्वे विभागाने विशेष श्रमिक एक्स्प्रेस गाड्यांची सोय केलेली आहे. मात्र देशाच्या काही भागात परप्रांतीय कामगारांचा अजुनही उद्रेक पहायला मिळतो आहे. गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील मोरा गावात आज परप्रांतीय मजूरांनी पुन्हा एकदा गर्दी करत आपल्या गावी परत जाण्याची मागणी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पोलीस ठाण्यात जमलेल्या या कामगारांनी दगडफेक करत परिसरातील वाहनांची नासधुसही केली. अखेरील पोलिसांनी तात्काळ अतिरीक्त कुमक मागवत १०० कामगारांना ताब्यात घेतलं आहे. जमलेल्या कामगारांपैकी बहुतांश कामगार उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा या राज्यांमधले होते. जिल्हा प्रशासनाने आमची घरी जाण्याची सोय करावी अशी मागणी हे कामगार करत होते. देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सूरतमध्ये अनेकदा परप्रांतीय कामगारांचा उद्रेक झालेला पहायला मिळत आहे. गुजरातमधील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज्य व केंद्रातील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

रोजगार व कामधंद्यासाठी इतर राज्यात गेलेल्या कामगारांना आपल्या घरी परतण्यासाठी रेल्वेने विशेष सोय केली आहे. मात्र ज्या कामगारांकडे रेल्वेच्या तिकीटाचे पैसे नाहीत, त्यांची चांगलीच कुचंबणा होताना दिसत आहे. काही कामगारांनी तर शेकडो किलोमीटर पायी चालत जात आपलं गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुरांचा प्रश्न हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे यश आलेलं नसल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 5:38 pm

Web Title: lockdown effect protests by migrants erupt again in surat psd 91 2
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमित शाह म्हणतात, “काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…”
2 “गुजरातमधून करोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”; भाजपाच्या खासदाराची मागणी
3 ‘त्या’ रुग्णांना करोना चाचणी न करताच घरी जाऊ देणार; केंद्राच्या नव्या सूचना
Just Now!
X