कोणत्याही सरकारने पारदर्शक पद्धतीने काम करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत कारण महाराष्ट्र सरकारने आकडेवारी लपवलेली नाही, असं अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना अमित देशमुख यांनी सरकारने पारदर्शक पद्धतीने काम न करणं लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं मत व्यक्त करत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावला.

“पस्पेक्टीव्ह पॉलिटीक्स धोकादायक आहे. मूळ गोष्टींपासून दूर जाणाऱ्या राजकारणापासून सर्वांना सावध राहायला हवं. मूळ गरजा बाजूला राहिल्यात आणि निवडणुका आणि राजकारण कशावर केलं जात आहे हे आपल्याला लक्षात येत नाहीय. हे धोकादायक असलं तरी आज तेच चाललं आहे. करोनाचं उदाहरण घ्यायंच झालं तर करोनाची ५० टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे असं सांगितला जातं. चाचण्या केल्या, रुग्णसंख्या लपवली नाही, उपचार केले. मुख्यमंत्र्यांनाही ही आपल्या म्हणण्यातून मांडलं. देशात अधिक रुग्णसंख्या आहे इतर राज्यांमध्ये रुग्णसंख्या आढळून येत नाही हे कसं काय. आपण जे पारदर्शक काम करतोय त्याचंच हे उदाहरण आहे. सरकारने परदर्शक काम करावं. पण याचा विसर पडतोय हे धोकादायक आहे. हे लोकशाही धोकादायक आहे. लोकांची दिशाभूल करुन आकड्यांची फेरफार, दरडोई उत्पन्न, बेरोजगारी देशासमोर आपण जी आकडेवारी उभी करतो त्यात फसवाफसवी दिसतेय,” असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख

नक्की वाचा >> भविष्यात काँग्रेसला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येणार; अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास

२०१३-१४ मध्ये काँग्रेस सक्षम नाहीय तुमच्या अध्यक्षांना पप्पु असं म्हणण्यात आलं. असं आम्ही खेळायला हवं हे तुम्हाला कळलं नाही. तुम्ही कमी पडला असं वाटतं का?, असा प्रश्न अमित यांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना असं मानता येणार नसल्याचं अमित यांनी म्हटलं. “असं मानन्याचं काही कारण नाही. युपीएचं सरकार देशात १० वर्ष राहिलं. सोनिया गांधी, राहुल गांधींनी नेतृत्व केलं. पहिली पाच वर्ष सोनिया गांधींमुळे राज्य आलं. त्यांनी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची निवड केली. युपीए टूच्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या जागा १६०-६५ वरुन २०६ वर गेल्या. यात राहुल गांधींची भूमिका महत्वाची राहिली. २१ ते २५ जागा उत्तर प्रदेशमधून आल्या. राहुल गांधीवरील विश्वास यासाठी कारणीभूत होता. त्या दहा वर्षात जे काही झालं आणि त्यानंतरच्य काळात जे परस्पेप्शन सरकारविरोधात तयार केलं त्याला पक्षाला, मतदारांना बळी पडावं लागलं. त्यावेळी उठवण्यात आलेल्या मुद्द्यांवर काय झालं. त्या मुद्द्यावर काही झालं नाही ते निकाली निघाले आणि त्यावर पुढे निर्णयात्मक असं काहीच झालं नाही. त्या मुद्द्यांभोवतीच आज राजकारण फिरतयं. ज्या आशेने देशातील मतदार एखाद्या पक्षाला संधी देतात त्याचं पक्षाने काय केलं?”, असा प्रश्न अमित देशमुख यांनी उपस्थित केला. तसेच देशात पक्ष सत्तेत येतात आणि जातात. पण सत्ता आल्यावर देश कुठे जातो हे महत्वाचं आहे. देश पुढे गेला की मागे गेला हे फार महत्वाचं आहे, असंही अमित देशमुख म्हणाले.

नक्की वाचा >> काँग्रेसच्या मुल्यांच्या आधारे उभारलेल्या यंत्रणाच करोना काळात शस्त्र म्हणून कामी आल्या : अमित देशमुख

राजीव गांधी, नेहरु, नरसिंह राव यांच्या कार्याकाळाची उदाहरण आपण आजही देतो. देशाची प्रगती झाली पाहिजे. काळ परत येत नाही. सत्ताधारी पक्षाचं हे काम असतं की देशाला पुढे घेऊन जाणं. राजकीय व्यवस्था, प्रशासनाच्या माध्यमातून पुढे घेऊन गेलं पाहिजे. लोकं हेच लक्षात ठेवतात. या सरकारने देशाला काय दिलं याची चर्चा भविष्यात होईल. यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येतील देशाच्या विकासात या व्यवस्थेने किती भर टाकली याची उत्तर आज तरी मिळत नाही भविष्यात मिळतील की नाही असं वाटतं नाही, असा टोला अमित देशमुख यांनी थेट केंद्र सरकारचं नाव न घेता लगावला.